💥परभणी जिल्ह्यातील युवासेना नेते माणिकराव भिमराव सुर्यवंशी निळेकर यांना मातृशोक....!


💥मातोश्री गंगाबाई भिमराव सुर्यवंशी यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी दुःखद निधन💥 

परभणी/पुर्णा (दि.३० जुलै) - परभणी जिल्ह्यातील शिवसेना/युवा सेना जिल्हा उप अधिकारी तथा पुर्णा तालुक्यातील युवा नेते माणिकराव भिमराव सुर्यवंशी यांच्या मातोश्री गंगाबाई भिमराव सुर्यवंशी यांचे काल शुक्रवार दि.२९ जुलै २०२२ रोजी रात्री ११-५१ मिनीटाच्या सुमारास त्यांच्या मुळगावी मौ.निळा येथे वृध्दापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात छत्रपती भिमराव सुर्यवंशी व माणिकराव भिमराव सुर्यवंशी ही दोन मुल सुना,पाच नाती,दोन नातवंड असा परिवार असून त्यांचा अंत्यविधी त्याच्या पुर्णा तालुक्यातील मौ.निळा या मुळगावी आज सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास होणार आहे.....

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व सुर्यवंशी कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ही ईश्वरा चरणी प्रार्थना...   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या