💥कौटुंबिक त्रासातून मानसिक स्वास्थ हरपलेल्या मातेने आपल्या लहाण नवजात बालकावर काढला राग...!


💥पुर्णा रेल्वे स्थानकावरील घटना : उपहार गृह चालक व आरपीएफचा पिएसआय हनुमंत यांच्या सतर्कतेमुळे बालक सुखरूप💥


पुर्णा (दि.०३ जुलै) - येथील रेल्वे स्थानक क्र.०१ वरील उपहार गृहाजवळ काल शनिवार दि.०२ जुलै २०२२ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या दरम्यान एक संतप्त महिला जवळील अंदाजे तिन/चार महिण्याच्या इवल्याश्या बालकावर राग व्यक्त करीत त्यास संतापाच्या भरात मारहान करीत असल्याचा व सदरील घटना पाहणाऱ्या लोकांना देखील शिव्या देत असल्याचा गभीर प्रकार घटला यावेळी सदरील महिला त्या बालकाला सोडून तब्बल अर्धा तास निघून गेली परंतु यानंतर पुन्हा त्या मातेची ममता जागृत झाल्यामुळे ती त्या बालका जवळ वापस आली हा घडणारा सर्व प्रकार येथील उपहारगृह चालक तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर सुर्यवंशी,मेनेजर मोहसीन भाई,हाकर फय्याज यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी घटनास्थळी स्वतः धावत जावून त्या महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत तिला शांत करीत तिच्या खाण्या पिण्यासह तिचा जवळील बालकाच्या दुधाची व्यवस्था केली यावेळी सुर्यवंशी यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे पिएसआय हनुमंत यांना देखील झालेल्या प्रकाराची माहिती दिल्याने ते देखील घटनास्थळी धावून आले यावेळी महिलेला संबंधित बालका विषयी व तिच्या संदर्भात माहिती विचारली असता त्या महिलेले आपण नांदेड येथील असल्याचे व आपल्या पतीचे नाव आदिनाथ सोळंके असल्याचे व जवळील लहाण बालक आपला मुलगा असल्याचे सांगत सासरची मंडळी त्रास देत असल्यामुळे आपण संतापाच्या भरात आपल्या मुलाला घेऊन घर सोडून निघून आल्याचे सांगितले यावेळी पिएसआय हनुमंत सहकारी महिला पोलिस कर्मचारी व किशोर सुर्यवंशी यांनी तिची समजूत काढत तिला दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास नांदेडकडे जाणाऱ्या गाडीमध्ये बसवून तिला पुन्हा तिच्या घरी पाठवले यावेळी रेल्वे सुरक्षा बल अधिकारी हनुमंत व सामाजिक कार्यकर्ते किशोर सुर्यवंशी यांच्या निदर्शनास असे आले की कुटुंबाकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे त्या महिलेच्या डोक्यावर परिणाम झाला असल्यामूळे तिला काही वेळ स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा देखील विसर पडत असल्यामुळे ती असे करीत असली तरी त्या मातेची ममता पुन्हा जागृत झाल्यानंतर ती त्याला जवळ घेत आहे.


सदरील प्रकार अत्यंत हृदयविदारक होता यावेळी त्या महिलेला आधार देण्याऐवजी लोक केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याचाही गंभीर प्रकार समोर आला परंतु सदरील भुकेल्या महिलेला दोन घास खाण्यासाठी व तिच्या बाळाच्या दुधाची व्यवस्था करण्यासाठी कोणीही समोर आले नाही अश्या वेळी उपहारगृह चालक सामाजिक कार्यकर्ते किशोर सुर्यवंशी व आरपीएफचे पिएसआय हनुमंत यांनी मानुसकीचे नाते जोपासत त्या उपाशी महिल्याच्या खाण्या पिण्याची व बालकाला दुधाची व्यवस्था केल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे....         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या