💥परभणी जिल्ह्यातील मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यातून आज एक दरवाजा उघडून साधारणतः7500 क्यूसेक विसर्ग सोडणार...!


💥पाटबंधारे विभागाने तहसिलदार पाथरी/मानवत/गंगाखेड/सोनपेठ/परळी आदींना दिला सतर्कतेचा इशारा💥

परभणी (दि.22 जुलै) मुदगल उच्च पातळी बंधारा  80.00% क्षमतेने भरला असून  पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक बघता आज दि. 22 जुलै 2022 रोजी रात्री 08-00 वाजता बंधाऱ्याचे एक द्वार उघडून नदीपात्रात साधारणतः 7500 क्यूसेक विसर्ग सोडण्याचे नियोजित आहे, येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते तरी सदर कालावधीत कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना तहसिलदार पाथरी/मानवत/गंगाखेड/सोनपेठ/परळी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात यावा अशी विनंती लघू पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या