💥आखाडा बाळापूर मध्ये डॉक्टरांच्या घरी जबरी चोरी चोराच्या हल्यात एकजन गंभीर जखमी💥
* शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील नविन बस स्थानक परिसरा जवळील दवाखान्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे कर्मचाऱ्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले त्यानंतर डॉक्टर सचिन देशमुख यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून त्यांच्या सात वर्षाच्या मुलांच्या गळ्याला चाकू लाऊन सुमारे सात लाखाचा एवज चोरट्यांनी पळविला आहे सदरील घटना दि 24/07/2022 रोजी रात्री अडीच वाजता हा प्रकार घडला आहे पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला
* सात वर्षाच्या मुलांच्या गळ्याला लावला चाकू :-
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील नविन बसस्थानक परिसरातील डॉक्टर सचिन देशमुख यांचा दवाखाना आहे या दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर देशमुख हें आपल्या कुटुंबासह राहतात आज पहाटे अडीच वाजता काही चोरटे एका स्कर्पीओ गाडीने दवाखान्या जवळ आले होते त्यांनी दवाखान्याच्या पाठी मागील दरवाजा तोडून आता प्रवेश केला त्यानंतर तेथें असलेल्या कर्मचारी विशाल होळगे यास मारहाण करणन्यास सुरुवात केली या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन तो खाली पडला .
त्यानंतर चोरट्यांनी दवाखान्यावर असलेल्या डॉक्टर सचिन देशमुख यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडला यावेळी डॉक्टर देशमुख यांच्या सात वर्षाच्या मुलगा श्रीयश देशमुख याला ताब्यात घेऊन मुलांच्या गळ्याला चाकू लावला तुम्हारे पास जो है ..हो जल्दी दो वरना बक्चो को मार डालेगे अशी धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टर सचिन यांनी त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांना दिली तसेंच चोरट्यांनी कपाट इचाक ईचक केली मात्र पोलिसांच्या गाडीचा सायरस वाजल्यानंतर चोरटे पसार झाले त्या त्या त्यानंतर जखमी कर्मचारी विशाल यास उपचारासाठी नांदेड हलविण्यात आले आहे
आखाडा बाळापूर येथील साई नगर भागातील दोन ते तीन घरे फोडून चोरीचा पर्यन्त झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे
* घटनास्थळी पोलिस पथक :-
या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान पथक जागेवर घुटमळले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय , सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्यानचे पोलिसांनी सांगितले
*सीसीटीव्ही फुटेज तपासनी करून चोरट्याचा शोध घेणार :-
या घटनेमध्ये नेमके चोरटे किती जन होते ते कोणत्या वाहनाने आले होते यांची खात्री पतलेली नाही त्यामुळे बसस्थानक परिसरातील दुकानाच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून चोरट्यांची ओळख पटविन्याचे प्रयत्न केले जाणार आहे * शिवाजी बोंडले उपनिरीक्षक पोलिस स्टेशन आखाडा बाळापूर
0 टिप्पण्या