💥राष्ट्रवादी युवक पक्षाचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांची मागणी💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी द्या अशी मागणी परमेश्वर इंगोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे हें निवेदन त्यांनी जिल्हाअधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
राज्यासह मराठवाडा व विदर्भातील सर्वत्र सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.विविध ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याने बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशसचिव परमेश्वर इंगोले यांनी केली.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करीत त्यांना मदतस्वरूपी दिलासा द्यावा तसेच ओलादुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावीत, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, तसेच अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई देण्यात यावी , हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात खत आणि बियाण्यांची खरेदी करण्यासाठी विशेष अनुदानाची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी देखील परमेश्वर इंगोले यांच्याकडून करण्यात आली आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले ..
अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेकडो हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. राज्यात आतापर्यंत १४१ लाख हेक्टरपैकी १०४ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. साधारणत: १५ जुलैपर्यंत खरिपाच्या सर्व पेरण्या आटोपतात.पंरतु, संततधार पावसामुळे पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे
हिंगोलीतील वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरुंदा तसेच परिसरातील गावांच्या शेतातील जमिनी खरडून गेल्या आहेत.सुमारे हजारो हेक्टरवरील खरीप पिके,फळपिके, भाजीपाला, बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तर,बाभूळगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
हवामान विभागाने राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अशा संकट प्रसंगी खंबीरपणे हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पाठिशी उभे राहावे,असे आवाहन परमेश्वर इंगोले यांनी केले....
0 टिप्पण्या