💥कळमनुरी नगर पालिका मुख्याधिकाऱ्यासह तिघांना 40 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले....!


 💥लाचपुचपत प्रतिबंध विभागाची धाडसी कारवाई💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगरपालिका हद्दीत केलेल्या कामाचे देयक देण्यासाठी 40 हजारांची लाच स्वीकारताना कळमनुरी न .प .मुख्याधिकारी उमेश कोठीकर या सह अन्य दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाच्या पथकाने दि 15/07/2022 रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे दरम्यान न .प .कार्यालयात तक्रार दाराकडून हि रक्कम स्वीकारली आहे. 


रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी एका कंत्राटदारास कामाचे पाच टक्के रक्कम म्हंजे 40 हजार रुपयाच्या रकमेची लाचेची मागणी न .प च्या मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार दाराकडे केली होती तक्रार दाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याबाबत रीतसर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली यांच्या कडे तक्रार केली होती 

या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि 14/07/2022 रोजी पडताळणी केली या पडताळणीत तथ्य आढळून आल्याने 15जुलै रोजी सापळा रचून नगरपालिका कार्यालयात 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याधिकाऱ्यां पकडण्यात आले लाचेच्या या सापल्यात नगरपालिकेचे कर्मचारी झाकीर हुसेन राहुल जाधव .यांचीहि समावेश असल्याचे एसिबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .

कोठिकर यांच्यासह झाकीर अहमद राहुल जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांना ताब्यात घेतले आहे हि कार्यवाही पोलिस ऊपअधिक्षक निलेश सुरडकर .पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर .विजय पवार .पो .हें .कॉ .विजय उपरे .ज्ञानेश्वर पंचलिंगे .शेख युनूस हिंमतराव सरनाईक  तान्हाजी मुंढे योगीता अवचार राजाराम फूफाटे या पथकाने ही कार्यवाही केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या