💥उस्मानाबाद जिल्ह्यातील धानोरा येथे मातंग समाजाच्या 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार...!


💥ऑल इंडिया पँथर सेनेकडून अमानवीय घटनेचा तिव्र शब्दात निषेध💥 

उस्मानाबाद (दि.२१ जुलै) - उस्मानाबाद जिल्ह्यातील धानोरा येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली असून दलित असलेल्या मातंग समाजाच्या चार वर्षीय चिमुडीवर गावातीलच नराधमाने बलात्कार केला. घटना एवढी गंभीर असताना गावातील जातीयवादी गावगुंडांनी हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आहे. गरीब, दलित असल्याचा फायदा घेतला गेला आहे. हे आमचं काय वाकड करणार ही मानसिकता आहे आणि त्यातूनच कायद्याचा धाक नसणे पोलिसांची भीती नसणे त्यामुळे नराधम बोकाळले आहेत.


ऑल इंडिया पँथर सेनेने या घटनेचा निषेध केला असून आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी केली असुन पीडित मुलीला पोलीस संरक्षण देण्याची देखील मागणी केली आहे या गंभीर घटनेत आरोपीच्या पाठीशी उभा राहिलेल्या नराधम जातीयवादी गावगुंडांना देखील सह-आरोपी करावे तसेच पिडित मुलीचे आरोग्य, शिक्षणासाठी २५ लाखांची तात्काळ मदत देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेनेकडून आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ गृहमंत्री पद जाहीर झाले पाहिजे बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा लोप पावला आहे. बेटी मिटाव धोरण सुरू झालेलं आहे. याचा आम्ही निषेध करतो. तात्काळ महिला आयोगाने, अनुसूचित जाती जमाती आयोगाने भूमिका घ्यावी आणि पिडीतांना भेट देऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी ऑल इंडिया पँथर सेनेची भूमिका असल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार केला यांनी म्हटले आहे......




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या