💥हिंगोलीतील पोस्ट कर्मचारी घरोघरी जाऊन सहभागी नोंदवून घेणार💥
* शिवशंकर निरगुडे : हिंगोली
भारतीय डाक विभागाने टाटा एल आयसीच्या अपघात विमा योजनेशी करार करून गरीब व मध्यमवर्गीय घटकातील नागरिकांना नविन विमा योजना आणली आहे या योजने अंतर्गत 299आणि 399 रुपयामध्ये दहा लाख रुपयाचा विमा कवच मिळणार आहे वर्ष भरासाठी यांची मुदत असणार आहे.
वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीय यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठी काटकसर करावी लागते अश्या परिस्थिती विमा काढायची इच्छा असली तरी ते विमा काढू शकत नाहीत आत्ता मात्र डाक विभागाने सर्व सामान्याला मध्यम वर्गाला परवडेल अशी योजना आणली आहे 18ते 65 वयोगटातील नागरिकांना हि योजना असून यात योजनेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पोस्टमन घरोघरी जाऊन मार्गदर्शन करत आहेत हिंगोली येथील डाक ऑफिस मधे या योजनेत सहभागी करून घेण्याची प्रक्रिया चालू झाली आहे
* काय आहे 299 रुपयाची योजना पॉलिसी :-
आघाती मृत्यु कायमचे अपंगत्व किंवा कायमचे अंशीक अपंगत्व यावर दहा लाख रुपयाचे स्वरकक्षन हि पॉलिसी प्रदान करणार आहेत या मधे 60 हजार रुपये उपचारासाठी मिळणार आहेत
* 399 ची पॉलिसी काय :-
या योजनेत विमा धारकांच्या अपघाती मृत्यु नंतर दोन मुलांना 1 लाख रुपयांची मदत शिक्षणातहि मिळू शकते हि मदत 299 च्या विम्यामध्ये मिळणार नाही त्याच प्रमाने अंत्यसंस्कार खर्च वाहतूक खर्च व शिक्षण खर्च देण्यात येतों
* या विमा पॉलिसी योजनेचा कालावधी :-
299 व 399 चा विमा काढल्यावर एका वर्षा नंतर नुतनीकरण करावे लागणार आहे या साठी पोस्ट विभागात इंडिया पोस्ट पेमेन्ट बँकेत लाभधारकांचे खाते असने बंधनकारक आहे यांची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी
* या योजनेसाठी अर्ज कसा करायचा :-
या योजनेसाठी पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन अर्ज करता येईल त्यासाठी आधारकार्ड नंबर व पैनकार्ड नंबर लागेल पोस्टात या योजनेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी कर्मच्याऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
* आत्ता हि योजना कोणा कोणा लागू नसणार :-
जेम्पीक रेशीण्ग तसेंच इतर काही खेळाडू लष्कर नैादल हवाई आणि पोलिस दलातील व्यक्ती आजारी अपंग असलेल्या व्यक्तींना हि योजना लागू नाही कोणत्याही ड्रायव्हीग व्यवसायशी सबंधीत व्यक्ती व तसेंच बांधकाम कामगारांना यात सहभाग नोंदविला जाणार नाही यांची सर्वानी नोंद घ्यावी
प्रतिक्रिया ...
सर्वानी या विमा काढावा भारतीय डाक विभागाचे 299 व 399 रूपया मध्ये लाखाचा विमा दिला आहे हि योजना अतिशय महत्त्वाकांक्षी असून यामधे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या योजनेत सहभाग नोंदवावा असे आव्हान आर .डी .बगाटे पोस्टमास्तर हिंगोली यांनी केले आहे
0 टिप्पण्या