💥जिंतूर पोलिस स्थानकाचे नूतन पोलिस निरीक्षकांचा इलेक्ट्रॉनिक मिडिया कडून जोरदार स्वागत सोहळा संपन्न...!


💥शासकीय विश्रामगृहात त्यांचा हिंदू धर्म प्रसारक आणि मुस्लिम मौलवी पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा संपन्न💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर व परिसरातील गावात वातावरण नेहमी सौदाहार्य पूर्ण कसे राहील,कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे मत  जिंतूर पोलीस स्थानकात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी महाराष्ट्र पत्रकार संघ जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून आयोजित स्वागत सोहळ्यात व्यक्त केले आज दी. 11/06/22  येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचा हिंदू धर्म प्रसारक आणि मुस्लिम मौलवी  व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा संपन्न झाला.

शुक्रवार दि 10 जून रोजी सर्वत्र जातीय सलोखा अडचणीत येत असताना जिंतूर शहरात मात्र मुस्लिम समाजातील बांधवा कडून शांततेत मार्ग काढत या परिस्थितीत चोख बंदोबस्त ठेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत नूतन पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी पदभार स्वीकारतात कार्य केले ही सुवर्णमध्य वेळ गाढत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया टीम कडून हिंदू धर्म प्रसारक महाराज आणि मुस्लिम मौलवी यांचा मिलाप ठेवत त्यांचाही सन्मान राखीत स्वागत सोहळा ठेवण्याच नियोजन केले ही अभिनंदनीय बाब असून पोलीस प्रशासन व  नागरिक यांच स्नेहपूर्ण वातावरण करण्यासाठी प्रथम पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नियोजन केले या बद्दल  स्वामी महेश चैतन्य महाराज जिंतूरकर व मौलवी अनिस यांनी गौरवदगार काढले.

जिंतूर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून दीपक दंतुलवार रुजू झाले आहेत त्यांचा यशोचित स्वागत सोहळा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप  कोकडवार यांनी पुढाकार घेऊन आयोजित केला होता ता अध्यक्ष भागवत चव्हाण सचिव अजमत खान उपाध्यय रहीम भाई  सल्लागार सचिन रायपत्रीवार संघटक  फेरोज भाई सह सचिव महेश देशमुख माबुद भाई, संदीप माहुरकर, माघडे ,राम रघाटे , ठोबरे ,दराडे बोरी येथील उपाध्यक्ष हनिफ शेख,टाक आदी उपस्थित होते कार्याध्यक्ष बी. डी. रामपूरकर यांनी सूत्रसंचालन तर अजमत खान यांनी आभार मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या