💥गोटे महाविद्यालयाच्या 'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' 9 वे पुष्प संपन्न💥
वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने 'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे नऊवे पुष्प मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातीलल प्राध्यापिका डॉ. मीनल कातरणीकर यांनी गुंफले. डॉ. कातरणीकर यांनी 1997 या वर्षी मुंबई विद्यापीठातून डॉ. शुभदा जोशी यांच्या मार्गदर्शनात "कांसेप्ट ऑफ प्रस्पेक्शन ए कॉम्परेटिव स्टडी : डिगनाग एंड एयर" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 जून 2022 या दिवशी त्यांनी 'प्रत्यक्ष संकल्पना' या विषयावर आपले व्याख्यान दिले.
डॉ.कातरनिक यांनी आपल्या व्याख्यानातून, दिग्नाग आणि एअर यांच्या प्रत्यक्ष संकल्पने संदर्भातील भूमिका मांडल्या. यावेळी त्यांनी भारतीयांची प्रत्यक्षाची संकल्पना ही घटनाकेंद्री आहे. तर पाश्चात्त्यांची प्रत्यक्षाची संकल्पना ही विधानकेंद्री किंबहुना भाषाकेंद्री असल्याचे सांगितले. दिग्नागाचे तत्वज्ञान किती महत्त्वाचे आहे हे सांगत असताना त्या म्हणाल्या की, भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ ईश्वर, आत्मा, किंवा मोक्ष एवढ्यापुरतीच मर्यादित नाही कारण आपल्याकडेही तार्किक विचार मांडणारे दिग्नागासारखे तत्त्वज्ञ आहेत. पाश्चात्य तत्त्वज्ञ एयर याची भूमिका प्रामुख्याने संशयवादाला छेद देणारी आहे म्हणून त्याच्या तत्त्वज्ञानाचे देखील महत्त्व आहे. दिग्नाग आणि एअरच्या प्रत्यक्ष संकल्पनेला अनुसरन स्व-लक्षण, सेन्स डाटा, संरचनावाद, निर्विकल्प, सविकल्प, संवेदन या सारख्या अनेक विषयाची चर्चा डॉ. कतरणीकर यांनी केला. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी "संशयवाद आणि तार्किक विचार" या विषयावर संशोधकांनी भविष्यात काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रच्या बहेरिल विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते....
0 टिप्पण्या