💥परभणी जिल्ह्यात विज वितरण कंपनीकडून ग्राहकांची होणारी लाखोंची लूट थांबवा - संभाजी सेना


💥परभणी शहरासह जिल्ह्यातून विलंब शुल्कापोटी महाविरण कडून लाखो रुपयांची लूट💥

 वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना प्रत्येक महिन्याला विज बिल घरपोच देण्याकरिता खाजगी कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये कोणत्याही वीज ग्राहकास विज बिल भरण्याच्या  दिनांक पूर्वी विज बिल मिळत नसुन विलंब शुल्काच्या काळातच विज बिल मिळते त्यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना सुद्धा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रत्येक महिन्याला वीज बिल भरताना विलंब शुल्क म्हणून किमान 10 ते 20 रुपये भुर्दंड सोसावा लागतो त्यामुळे परभणी शहरासह जिल्ह्यातून विलंब शुल्कापोटी लाखो रुपयांची लूट वीज ग्राहकांची होत आहे.

 परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विज बिल प्रत्येक महिन्याला पोहोचवले जात नाही त्यामुळे नियमित वीज बिल भरणा करण्याची इच्छा असताना देखील ग्राहकांना बिल मिळत नसल्याने त्यांना विनाकारण प्रचंड मोठा दंड सोसावा लागतो परिणामी त्या ग्राहकांची वीज कट करण्याची वेळ येऊन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे संभाजी सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे कळवले असून विज बिल वाटपाचे काम आपल्या मर्जीतील लोकांना दिल्याने ते सोयीप्रमाणे विज बिल वाटपाचे काम करतात तर कधीकधी वर्षभराचे बिल एकदाच देऊन टाकतात, त्यामुळे ग्राहकांची मात्र लाखो रुपयांची लूट होते सदरील कंपनीचे वीजबिल वितरणाचे टेंडर तात्काळ रद्द करावे व जनतेची होणारी लाखो रुपयांची लूट थांबवावी अन्यथा संभाजी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आला आहे.

सदरील निवेदनावर प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे,जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर,शहराध्यक्ष अरुण पवार,विक्रम काळे, पवन कुरील , दत्ता नंद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.,,.,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या