💥उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रभाग निहाय आरक्षण सोडतीची घोषणा💥
जिंतूर प्रतिनिधी /बी.डी. रामपूरकर
जिंतूर : जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. १३ वार सोमवार रोजी सकळी ११ वाजता शहरातील मौलाना आझाद सभाग्रहात उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या प्रभाग निहाय आरक्षण सोडतीची घोषणा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले. या पंचवार्षिक मध्ये प्रभागाची संख्या एक प्रभाग वाढल्या मुळे जिंतूर नगर परिषद सभागृह सदस्य संख्या आत्ता २३ वरून दोन ने वाढुन २५ झाली आहे. येणाऱ्या पंचवाषिक मध्ये सभागृहात एकूण सदस्य संख्या पैकी १२ पुरुष व १३ महिला सदस्य असणार आहेत. प्रभागानिहाय पुढील प्रमाणे आरक्षण घोषित झाले आहे. प्रभाग क्रमांक १ ते ८ मध्ये सर्वसाधारण महिला १ व सर्वसाधारण पुरुष १ असे खुला प्रवर्ग राखीव आहे. प्रभाग क्रमांक ९ हा एकूण ३ सदस्यांचा असून यामध्ये २ सर्वसाधारण महिला व एक अनुसूचित जाती पुरुष करिता राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १० व ११ मध्ये सर्वसाधारण महिला १ व सर्वसाधारण पुरुष १ असे खुला प्रवर्ग राखीव आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण पुरुष असे जाहीर आरक्षण करण्यात आले आहे.
जिंतूर शहरातील नेतेमंडळींची अनेक दिवसापासून प्रभाग निहाय आरक्षणाकडे लक्ष लागून होते. त्या प्रतिक्षेला आज अल्पविराम मिळाला असून आगामी निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता घोषणेची उत्सुकता आत्ता लागली आहे. निवडणुकीत आपले भविष्य अजमावणारे इच्छुक आता तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची ओबीसी आरक्षण शिवाय होणार आहे आता जवळपास नक्की झाले आहे. जिंतूर शहरात ओबीसी मतदारांची संख्या तुलनात्मक असून राजकीय पक्षांची स्थानिक नेते मंडळी इच्छुक ओबीसींच्या उमेदवारीबद्दल नेमकी काय भूमिका घेतात याकडे ओबीसी मतदारांचे लक्ष वेधले आहे. आरक्षण सोडतीला जिंतूर नगरपालीका मुख्य अधिकारी संतोष लोमटे, नगरपरिषद कर्मचारी के.एल पवार, एस आर आडणे, चाऊस इत्यादी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या