💥सोपानराव वानखेडे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सवनेकराच्या वतीने सत्कार...!


💥सोपानराव वानखेडे पाटील सवनेकर यांचा सवनेकर गावकऱ्यांकडून नुकताच सत्कार💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली आगारातून सलग 29 वर्ष सेवा करून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले सोपानराव वानखेडे पाटील सवनेकर यांचा सवनेकर गावकऱ्यांकडून नुकताच सत्कार करण्यात आला.

           सोपानराव वानखेडे पाटील हे प्रथम हिंगोली आगार नंतर गंगाखेड व कळमनुरी या परभणी विभागांतर्गत येत असलेल्या आगारांमध्ये वाहक म्हणून गेले 29 वर्ष सेवा करून वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्याबद्दल सवना येथील ग्रामस्थांच्यावतीने हिंगोली येथील आदर्श कॉलेज रोड अकोला बायपास येथील त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सवना येथील सरपंच प्रतिनिधी एडवोकेट प्रवीण नायक , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख पत्रकार गोपालराव सरनायक , माजी सरपंच तथा भाजपाचे सेनगाव तालुका उपाध्यक्ष गजानन नायक, सेवानिवृत्त माजी सैनिक दत्तराव नायक , प्रकाशराव नायक,सतीश नायक, संदीप नायक, जगन्नाथ क्षीरसागर ,गणेश नायक, नायक,,अविनाश वानखेडे ,अभिजीत वानखेडे यांची यावेली उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या