💥नामांकित डॉक्टरांसह औषध विक्रेत्यांकडून रुग्णांची लूट....!


💥जिंतूरातील तालुक्यातील प्रकार ; अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडून कारवाईची मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी / बी. डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील नामांकित डॉक्‍टर तसेच मेडिकल व्यावसायिकाकडून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कडून मोठ्या प्रमाणावर लूट करण्यात येत असून अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यात येत असल्यामुळे तालुक्यात ग्राहकाने रुग्णांची होणारी लूट तत्काळ थांबविण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिंतूर च्या वतीने मंगळवार 28 जून रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात मध्ये करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,जिंतूर शहरातील नामांकित डॉक्टर व मेडीकल व्यवसायीकांकडुन रूग्णांची लुट होत असुन अप्रशिक्षीत औषध निमति मेडीकलवर ठेवून ग्राहकांची लुबाडणूक करण्याचे काम मेडीकल चालक करीत असल्याचे ग्राहकांच्या तक्रारीवरून दिसुन येत आहे. सदरील मेडीकल धारकांनी दहावी, बारावी, नापास मुलांना मेडीकलवर अल्पशे मानधन देवून कामाला ठेवले आहे. तेच कर्मचारी नागरीकांना डॉक्टरने दिलेल्या चिठ्यांवरून औषधी देत असल्याने अनेक नागरीकांना या औषधांचा दुषपरिणाम झाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. तरी सदरील मेडीकल धारकांनी प्रशिक्षीत औषध निर्माता दुकानावर ठेवावे व ग्राहकास मेडीकलचे बिल देण्यात यावे. अनेक चालक प्रिंटर खराब आहे. मालक दुकानात नाहीत, बिलाची आवश्यकता नाही. आम्ही दिलेले गोळया औषध बरोबर आहेत. सदरील औषध डॉक्टरांना दाखविता न दवाखान्यातील नौकरच सदरील गोळया व औषधाची मात्रा घेण्याचे सांगत.

असल्याने व औषध कोणते दिले याची खात्री न करता ग्राहकांची आर्थिक लुट केली जात आहे. तसेच शहरातील नामांकित डॉक्टर स्लाईनची आवश्यकता नसतांना स्लाईन लावा, असा आग्रह करून ग्राहकांना औषध इन्जेक्शन व इतर साहित्या खरेदी करून सदरील स्लाईनची किंमत रु. ७०/- असतांना डॉक्टर महाशय रु ६००/- घेत आहेत ही एक प्रकारे डॉक्टर मंडळी ही रूग्णांची लुट करीत आहेत .व दवाखान्यातही प्रशिक्षीत कर्मचारी न ठेवता तिन ते चार हाजारावाला महिला किंवा मुलगा कामाला ठेवला आहे. तोच सर्व दावाखान्याची यंत्रणा चालवित आहे तरी, मे जिल्हाधिकारी साहेबांनी सदरील निवेदनाची दखल घेवून मेडीकल व डॉक्टर यांच्या दवाखान्याची तपासणी करावी, अशी मागणी आखिल भारतीय ग्राहक पंचायत जिंतूर च्या वतीने करण्यात येत आहे. जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे, सचिव मंचकराव जगताप, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे ,शहराध्यक्ष दिलीप देवकर तसेच रफिक तांबोळी. संतोष रोकडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

*सोबत फोटो:* 1) शहरातील एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला केवळ 70 रुपये दराचे सलाईन दिले असताना त्याच्याकडून तब्बल 600 रू रक्कम वसूल करण्यात आली.


2) शहरातील नामांकित रुग्णालय तसेच औषधी विक्रेत्यांकडून होणारी तात्काळ थांबविण्याची मागणी जिंतूर तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करताना तालुका अध्यक्ष गुलाबराव शिंदे, मंचकराव जगताप, ज्ञानेश्वर रोकडे, दिलीप देवकर ,रफिक तांबोळी, संतोष रोकडे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या