💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या...!


💥मोठी बातमी : शिंदे गटातील 20-25 बंडखोर आमदारांमध्ये मतभेद ; 'मातोश्री'शी संपर्क💥

एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 50 आमदारांचे सख्याबळ आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट कायद्यात बसत नाही. त्यासाठी बंडखोर आमदारांना कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावच़ लागेल अशी अट आहे. परंतू दुसऱ्या पक्षात जाण्यावरून 20 ते 25 बंडखोर आमदारांमध्ये मतभेद असल्याने हे बंडखोर आमदार पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात असून, उद्धव ठाकरेंशी मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी सेनेच्या अनेक बड्या नेत्यांना फोन केल्याची माहिती देखील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

* शिवसेनेला पुन्हा झटका,उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील : 

शिवसेनेला पुन्हा झटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता राज्यातील आणखी एक मंत्री सामील झाले आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही.

* एकनाथ शिंदे यांच्यासह 16 जणांना अपात्रतेची नोटीस :

पक्षादेश बजावूनही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल शिवसेनेने केलेल्या अर्जानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या सर्वाना सोमवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. या नोटिशीमुळे शिवसेना व शिंदे गटात आता कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला.

* “तुमच्यात हिंमत असेल तर…संजय राऊत!” :

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे.  ते म्हणाले, “तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना ? कोण काय करतंय त्यानं काही फरक पडत नाही”,असंही राऊत म्हणाले.

* ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ झळकला पहिला बॅनर :

राज्यासह ठाण्यामध्ये राजकीय वातावरण ढवळलं आहे. ठाण्यात सर्वत्र एकनाथ शिंदे समर्थक यांच्याकडून बंडाच्या पहिल्या दिवसापासून बॅनरबाजी करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत असल्याचे बॅनर उभा राहताहेत. हे घडत असतानाच आज ठाण्यात एक बॅनर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ देखील लावलेला दिसून आला आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात लावलेला हा पहिला बॅनर असल्याचं समजतंय.

* टिम इंडियाच्या अडचणीत वाढ ; रोहित शर्माला कोरोनाची लागण ;

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलैला होणार असून याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीबीसीसीआयने ट्विट करत याची माहिती दिली आहे. रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या