💥आयकर विभागाचा उपक्रम कौतुकास्पद -- सतीश गुप्त


💥बुलढाणा येथे आयकर विभागातर्फे जिल्ह्यातील विविध बँका, पतसंस्था तसेच सनदी लेखापाल यांचा सत्कार संपन्न💥 

✍️ मोहन चौकेकर

बुलढाणा :- आयकर विभागातर्फे जिल्ह्यातील विविध बँका, पतसंस्था तसेच सनदी लेखापाल यांचा सत्कार संभारंभ कार्यक्रम बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी, बुलढाणा याठिकाणी संपन्न झाला. आयकर विभागाद्वारे देण्यात आलेल्या विहित मुदतीत व विहित नमुन्यात आपल्याजवळील माहिती आयकर विभागाला सादर करणाऱ्या जिल्ह्यातील विविध बँकांचा, पतसंस्थांचा यावेळी गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील आयकर अधिकारी श्रीमती शिरीन युनीस व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. सतिश गुप्त उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आयकर अधिकारी श्रीमती शिरीन युनीस यांनी आयकर विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी बोलताना सतीश गुप्त म्हणाले, केंद्र शासनाने मागील काही वर्षात सुयोग्य पावले उचल्याने आयकर भरनारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आयकर विभागाद्वारे राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून सरकार आणि करदाता यांना जोडणारा महत्वपूर्ण दुवा असल्याचे सांगितले. शासनाद्वारे आयकर स्लॅब मध्ये देण्यात आलेल्या सुटीमुळे अधिकाधिक नागरिक आयकर रिटर्न दाखल करीत असून शासनाद्वारा या स्लॅबमध्ये अजून काही सूट दिल्यास त्याचा फायदा निश्चितच नागरिकांना होईल. यावेळी चिखली येथील प्रथितयश सीए भगवान नागवानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील बँकांचे व पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या