✍️ मोहन चौकेकर
औरंगाबाद / संभाजीनगर- शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज बुधवारी (८ जून) सायंकाळी ६:०० वा. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे त्यासाठी मोठी गर्दी उसळणार असून अति विराट जाहीर सभा होणार आहे.ही सभा महाराष्ट्रातील रेकॉर्डब्रेक सभा ठरणार आहे. सभेस शिवसेना नेते खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई साहेब, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मराठवाड्यातील सर्व खासदार, आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
*शिवसेनेच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली* असून शहरात १०००० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकात सर्वत्र भगवे ध्वज फडकवण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी १००० पोस्टर्स लावण्यात आले आहेत *संपूर्ण संभाजीनगर भगवेमय झाले आहे.* २ लाख पत्रक घरोघरी वाटून निमंत्रण देण्यात आले आहे. या सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सर्वसामान्य नागरिकांनी देखील हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यावे असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.
*महत्वाचे प्रसिद्धीपत्रक :-
*शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सभेकरिता येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी वाहतूक नियोजन व पार्किंगची सोय तसेच खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे*
१) सिल्लोड, जालना, बीड, अंबड या ठिकाणाहून सभेसाठी येणाऱ्या वाहनांनी केंब्रिज चौक, बीड बायपास, मार्गे रेल्वे स्टेशन कडून येऊन त्यांच्यासाठी आयोध्या नगरी व कर्णपुरा मैदान या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
२) तसेच कन्नड, वैजापूर बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी आयोध्यानगरी, व कर्णपुरा मैदान या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे.
३)शहरातून येणाऱ्या वाहनांसाठी विवेकानंद कॉलेज, जिल्हा परिषद मैदान, एमपी लॉ कॉलेज मैदान, कर्णपुरा मैदान याठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
४)सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सांगितलेल्या ठिकाणीच वाहनांची पार्किंग करावी.
५)कुणीही रस्त्यावर अस्ताव्यस्त गाड्या पार्क करू नये
६)कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी
७)त्याचप्रमाणे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपली व पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही या दृष्टीने शिस्तीचे पालन करावे
८)आक्षेपार्ह घोषणाबाजी करू नये ९)सभेत येणाऱ्या महिलांचा योग्य आदर करावा सभा संपल्यानंतर ज्येष्ठ नागरिक महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांना अगोदर जाऊ द्यावे.
असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या