💥स्पर्ध्येच्या घोडदौडीत एस एम सी इंग्लिश स्कूलच्या मुकुटावर १०० टक्के निकालाचा आणखी एक मानाचा तुरा....!


💥अनंत वानखेडे या विद्यार्थ्याने ९५.८० टक्के घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला💥 

फुलचंद भगत

वाशीम : ५० वर्षापूर्वी इंग्रजी शिक्षण देण्यासाठी सुरु झालेले छोटेसे रोपटे एस एम सी इंग्लिश स्कूल च्या भव्य इमारतिच्या वटवृक्षाच्या स्वरुपात डौलाने, उत्तंग रुपात उभे आहे. हे कोणाच्याही नजरेतून सुटू शकत नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही एस एम सी इंग्लिश स्कूल च्या इतिहासात १० व्या वर्गाचा १०० टक्के निकाल लागला आहे. 

               सन २०२१-२२ च्या १० व्या वर्गाच्या परीक्षेला एस एम सी इंग्लिश स्कूल चे एकूण ६४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ९० टक्केच्या वर २९ विद्यार्थी, विशेष प्राविण्यासह ३१ विद्यार्थी तर ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.दर्शन अनंत वानखेडे या विद्यार्थ्याने ९५.८० टक्के घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.  श्रद्धा नरेश धूत ९५.२० टक्के  घेऊन द्वितीय तर श्रीपर्ना प्रमोद घुगे ९४.६० टक्के, वेदश्री सूर्यकांत देशमाने ९४.६० टक्के, प्राची घनश्याम भोणे ९४.६० टक्के हे तीन विद्यार्थी शाळे मधून तिसरे आले आहे. त्याचबरोबर ५६ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात विशेष प्राविण्यासह, ४२ विद्यार्थी मराठी विषयात विशेष प्राविण्यासह, ६४ विद्यार्थी हिंदी-संस्कृत विषयात विशेष प्राविण्यासह, ४७ विद्यार्थी गणित विषयात विशेष प्राविण्यासह, ६३ विद्यार्थी विज्ञान विषयात विशेष प्राविण्यासह आणि ६० विद्यार्थी सामाजिक शास्त्र  विषयात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे.  शाळेचा १०० टक्के निकाल लागण्याची वैशिष्ट्य शाळेमध्ये उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग, विषयांचे घटक नियोजन आणि त्यानुसार त्यावरील चाचण्या, उत्तरपुस्तिका वेळोवेळी तपासून देवून त्यातील चुकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत शिक्षक व पालक यांचा वेळोवेळी सुसंवाद, हवेशीर, मोठ्या व सर्व सोयीनी उपलब्ध असलेल्या वर्ग खोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा व वाचनालय, खेळासाठी मोठे मैदान व सर्व सुविधायुक्त, संगणक शिक्षण, अभ्यासाला पूरक असे सर्व वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते हे विशेष:  संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. हरिभाऊ क्षीरसागर आणि मुख्याध्यापिका कु. मीना उबगडे यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या