💥अहमदनगर रेल्वे स्टेशनावर मिळालेला अल्पवयीन बालक सुखरूप आपल्या घरी परतला....!


💥तोपर्यंत मुलाला कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बेवारस मिळून आला म्हणून नोंद करण्यात आली होती💥 

अहमदनगर : स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक यांनी माहिती दिली की, 11-12 वर्षाचा अल्पवयीन एक मुलगा बेवारस अवस्थेत आढळला आहे. तो आपला पत्ता नांदेड आहे असे सांगतो. सदर मुलाला घरी पोहच करण्यात मदत करा. यानंतर चाईल्ड लाईनचे समुपदेशक अलिम पठाण व टिम मेंबर राहुल कांबळे यांनी सदर ठिकाणी ताबडतोब धाव घेतली असता तेथे गेल्यानंतर सदर बालकाला ताब्यात घेतले. त्याचे समुपदेशन केले व संपूर्ण माहिती घेतली. तेव्हा त्याने सांगितले की, तो नांदेड जिल्ह्यातील पूर्णा गावात राहतो. आपल्या मित्राबरोबर घर सोडून फिरण्यासाठी निघून आला, त्याला घरच्यांचा कोणाचाही मोबाईल नंबर माहित नव्हता. यानंतर चाईल्ड लाईनचे समुपदेशक अलिम पठाण आणि राहुल कांबळे यांनी नांदेड येथील स्वयंसेवक यांना फोन केला व सदरील सर्व हकीकत त्यांना सांगितली व मुलाच्या घरच्यांचा शोध घेण्यास सांगितले. तोपर्यंत मुलाला कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बेवारस मिळून आला म्हणून नोंद करुन त्याला तात्पुरता शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले. 

पूर्णा येथील शेख इरफान सामाजिक कार्यकर्ते यांना मुलाचा फोटो व माहिती हि Whatsapp वर पोस्ट केली, मुलाच्या घरचा शोध लावण्यास प्रयत्न केला. यानंतर 2 तासानंतर सदर मुलाच्या घरच्यांचा तपास लागला. त्यांनी अहमदनगर चाईल्ड लाईनला फोनवर संपर्क साधला असून आम्ही उद्या मुलाला घेण्यास अहमदनगरला येतो असे सांगितले. आपण सर्वांच्या मदतीने बालकाला घरी पोहचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या