💥मंगरुळपीर येथे हज यात्रेकरूंचे स्वागत....!

 


💥शहरातील प्रसिद्ध उद्योगपती मोबिनुल हक आणि त्यांचा मुलगा डॉ.साकिबुल हक यांचा सत्कार कार्यक्रम आज संपन्न 💥

फुलचंद भगत

वाशिम :- मंगरूळपीर येथील स्थानिक डॉ.एपीजे ए.कलाम चौकात हज 2022 च्या पवित्र यात्रेला जाणारे शहरातील प्रसिद्ध उद्योगपती मोबिनुल हक आणि त्यांचा मुलगा डॉ. साकिबुल हक यांचा सत्कार कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला. मंगरुळपीर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर,सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत,काँग्रेस शहर अध्यक्ष सलीम जहागीरदार, कौमी तंजीम जिल्हाध्यक्ष मुख्तार खान पटेल, माजी नगरसेवक उबेद मिर्झा, गझनफर हुसेन मास्टर,जुबेरभाई आदींनी स्वागत करून हज यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या