💥शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनासाठी सोयाबीनची लागवड बीबीएफ पद्धतीने करा - डॉ.गजानन गडदे


💥जिल्हा मासिक चर्चासत्रा अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन💥

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामधील पोहेटाकळी, जैतापुरवाडी, खेर्डा, वडी आणि बोरगव्हाण या ठिकाणी दि.24 जुन 2022 रोजी जिल्हा मासिक चर्चासत्रा अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याहेतू हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे यांनी शेतक-यांनी बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची लागवड करावी असे आव्हान केले कारण या पद्धतीमध्ये जास्त पाऊस पडल्यास  बीबीएफच्या सऱ्याद्वारे हे पाऊस वाहून जाते. तसेच कमी पाऊस पडल्यास ते सऱ्यामध्ये जागच्या जागी मुरते व पिकांना उपलद्ध होण्यास मदत होते. तसेच पिकामध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे पारंपारीक पद्धतीपेक्षा 20% अधिकचे उत्पादन मिळते. सदरील कार्यक्रमास विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत, डॉ.काकडे, कृषि उपसंचालक श्री.बी.एस.कच्छवे, तालुका कृषि अधिकारी श्री.वी.टी.शिंदे, श्री.प्रभाकर बनसावडे, श्री.काळे, श्री.भिसे, तसेच कृषि विभागाचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक आणि शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या