💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स / बातम्या...!


💥गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट ; एसआयटीच्या निर्णयविरोधातील याचिका फेटाळली💥

 ✍️ मोहन चौकेकर

* उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान,हिच वीट आता तुमच्या डोक्यात हाणनार,आता वेळ निघून गेली,लढाई आम्हीच जिंकणार, आपल्या सोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन, शिवसैनिकांचा उद्रेक,आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर दगडफेक

* मोठी बातमी एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का : सेनेचे गटनेते अजय चौधरी राहणार

* गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींना सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट ; एसआयटीच्या निर्णयविरोधातील याचिका फेटाळली

* ‘एमपीएससी’चा महत्त्वपूर्ण निर्णय : राज्यसेवेची परीक्षा योजना, अभ्यासक्रमामध्ये बदल आता वर्णनात्मक स्वरुपाची परीक्षा ; या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून

* शमशेरा’चा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित, रणबीर कपूर, संजय दत्तने वेधलं साऱ्यांचं लक्ष : रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘शमशेरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

* “यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करायचं नाही का ? ” उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण ; शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला

* ‘म्हाडा’ सोडतीसाठी आता प्रतीक्षा यादी बंद – राज्य सरकारने घेतला निर्णय : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती ; प्रतीक्षा यादीच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून सोडत प्रक्रियेत बदल

* बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती ; कान, नाक,घसा आणि नेत्ररोग सेवा उपलब्ध होणार : पहिल्या टप्प्यात नेत्र आणि कान,नाक,घसा या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने अर्ज मागविले आहेत.

* अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात एकास अटक : याबाबत पीडीत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

* शहाड येथे रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात शाळेची बस अडकली पादचाऱ्यांनी केली विद्यार्थ्यांची सुटका : शहाड येथे गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने या भागातील रस्त्यावर पाणी साचले होते.

* पत्त्यासारखी कोसळली घरे, १ हजारपेक्षा अधिक लोकांना गमवावा लागला जीव : अफगाणिस्तानला भुकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भुकंपात १ हजारपेक्षा अधिक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक नागरीक जखमी झाले आहेत.

* पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट, ६० जणांना ठोकल्या बेड्या; वारकरी वेशात फिरत होते पोलीस २२५ जणांना घेतलं होतं ताब्यात; तब्बल साडेपाच लाखांचे दागिने हस्तगत

* पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४८ लाखांची फसवणूक : या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* पाच वर्षांखालील मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्या ; पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला : सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना इन्फ्लूएन्झाची लस देण्याच्या सूचना बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहेत.

 * गव्हाच्या पिठाची निर्यात बंदी शक्य ; गहू निर्यात बंदीनंतर केंद्राचा सावध पवित्रा गहू निर्यात बंदी करताच व्यापाऱ्यांनी गव्हाच्या पिठाची निर्यात करण्याचा मार्ग अवलंबला होता

 * पुण्यात उपहारागृहात तोडफोड करत टोळक्याची दहशत ; खुर्ची न दिल्याने चौघांना मारहाण : हॉटेल, परमिट रुम तसेच एका दुकानावर दगडफेक देखील केली....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या