💥पो.नि.दिपक दंतुलवार यांनी केले बोगस डॉक्टर नवकुमार मंडलला जेरबंद💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट गेल्या दहा वर्षापासून चालू असून २०१४ साली बोगस डॉक्टर आढळून आल्यामुळे आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जिंतूर पोलिसात ३० एप्रिल २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपी बोगस डॉक्टर तेव्हापासून फरार होता त्या डॉक्टरला जिंतूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी जेरबंद केले आहे. त्यामुळे तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या वर्तुळात धडकी भरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात बोगस डॉक्टर नवकुमार मंडल हा गोरगरीब लोकांना मी डॉक्टर असल्याची भासउन औषध उपचार करीत आहे. याची माहिती त्याकाळी बोगस डॉक्टर विरोधी पथकाला मिळाल्याने त्यांनी अचानकपणे धाड टाकून नवकुमार मंडल विरुद्ध गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून सदर बोगस वैद्यकीय व्यवसायीक फरार होता दरम्यानच्या काळात शिवनी तालुका किनवट या गावात त्या डॉक्टरने आपले बस्तान बसवले व त्याही ठिकाणी त्यांचा बोगसगिरी चा व्यवसाय सुरू केला. बलात्कारासारख्या महाभयंकर गुन्ह्यामध्ये तो अडकला गेला हीच माहिती पोलिसांना मिळताच जिंतूर पोलीस ठाण्यात नुकतेच नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपक दंतूलवार यांनी तात्काळ तपास चक्रे फिरवत त्याला नांदेड येथील कारागृहात असताना जिंतूर पोलिसांच्या ताब्यात घेतले तूर्त त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील कार्यवाही चालू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच आता पावसाळ्याचा हंगाम येत असतानाच बोगस डॉक्टर लोकांचा सिझन चालू झाला आहे. त्यामुळे आता या कार्यवाहिमुळे बोगस डॉक्टरांचेधाबे दणाणले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकामार्फत पण आता बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारा वर धडक कार्यवाही सुरू आहे. आम्ही सर्वांचे कागदपत्रे मागून त्याची चौकशी करून तालुकास्तरीय समिती समोर ठेवणार व सर्व ग्रामपंचायतींनी जर बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची नोंद घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा गटविकास अधिकारी यांना कळवावे अशी माहिती ता आरोग्य अधिकारी डॉ बोराळकर यांनी दिली....
0 टिप्पण्या