💥जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे💥
✍️ मोहन चौकेकर
जागतिक आरोग्य संघटना द्वारे दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा जागतिक कार्यक्रम आज म्हणजेच १४ जून २०२२ रोजी मेक्सिको सिटी येथे होणार आहे. रक्त आणि रक्त उत्पादनांचे संक्रमण दरवर्षी लाखो जीव वाचवण्यास मदत करते जागतिक रक्तदाता दिनाचे महत्त्व- जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे आहे.
जागतिक रक्तदान दिनाचा इतिहास :-
जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त पुढाकाराने २००५ मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा दिवस कार्ल लँडस्टेनरच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो.
जागतिक रक्तदान दिन २०२२ ची संकल्पना- दरवर्षी जागतिक रक्तदान दिनानिमित्त वेगळी थीम ठेवली जाते. या वर्षीची थीम आहे – ”रक्तदान हे एकतेचे कार्य आहे. या प्रयत्नात सामील व्हा आणि अनेकांचा जीव वाचवण्यात मदत करा.”
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या