💥अदिवासी पारधी वस्ती रस्त्याचे प्रेरणाताईंच्या हस्ते लोकार्पण💥
किरण घुंबरे पाटील
पाथरी:-तालुक्यातील वाघाळा येथील आदिवासी पारधीवस्तीवर जाणा-या स्वखर्चातून तयार केलेल्या रस्त्याचे लोकार्पण बुधवार १५ जुन रोजी प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. गत वर्षी याच रस्त्याने चिखल तुडवत कधी पाई तर कधी गाडी बैलातून त्यांनी आदिवासी पारधी वस्ती गाठली होती. आज मात्र स्वत:ट्रॅक्टर चालत त्या वसाहतीवर गेल्या आणि या सुंदर रस्त्याचे लोकार्पण करून दिला शब्द पाळला.
या वेळी झालेल्या कार्यक्रमा साठी जिल्हाबँकेच्या संचालिका तथा युवानेत्या प्रेरणाताई वरपुडकर यांच्या सह विश्वनाथराव थोरे,सरपंच बंटी पाटील,विजयकुमार घुंबरे,माणिक घुंबरे,माऊली गिराम,ओमप्रकाश नखाते,काळे,डॉ महेश कोल्हे,उद्धवराव रामपुरीकर आदींची उपस्थिती होती.
गतवर्षी वाघाळा गावातील आदिवासी पारधी समाजाचा तरुन रस्त्या अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने दगावला होता. या विषयी प्रिंट आणि इलेक्टॉनिक माध्यमां मधून वृत्त प्रकाशित होताच पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशराव वरपुडकर यांनी त्यांच्या स्नुशा प्रेरणाताई वरपुडकर यांना या विषयीची पहाणी करण्यास पाठवले.
घटनेच्या दुस-याच दिवशी प्रेरणाताई वरपुडकरांनी वाघाळा येथे येऊन या वस्तीला भेट देणार असल्याचे सांगुन चिखलाचा रस्ता कधी पाई तर कधी गाडीबैलातून पार करत वस्ती गाठली आणि दुखी कुटूंबाचे सांत्वन केले होते. या वेळी हा रस्ता पावसाळा संपताच स्वखर्चातून करून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्या अनुशंगाने पावसाळा संपताच वाघाळा येथील ताईंचे तरुन कार्यकर्ते आशोक उर्फ पिंटू घुंबरे यांच्या पुढाकारातून या रस्त्याचे माती काम पुर्ण केले. त्या नंतर ऊस जाण्याची अडचन म्हणून त्या वर मुरुम टाकने राहिले होते. गत पंधरा दिवसा पुर्वी या संपुर्ण अडीच किमी रस्त्यावर पक्का मुरुम टाकुन हा रस्ता रहदारी योग्य केला. आता पावसाळ्यात पहिल्या सारखा त्रास या वस्तीवरील नागरीकांना आणि शेतक-यांना ही होणार नसल्याचे आदिवासी वस्ती वरील नागरीक सांगत आहेत.
बुधवार १५ जुन रोजी प्रेरणाताई वरपुडकर यांनी या रस्त्या वरुन स्वत:ट्रॅक्टर चालवत आदिवासी वस्तीवर जाऊन या ठिकाणी या रस्त्यावर नारळ वाढऊन,फित कापुन लोकार्पण केले. या वेळी प्रेरणाताईंचे वस्तीवरील महिला भगिनिंनी औक्षण करुन स्वागत केले. या वेळी आदिवासी वस्तीवरील नागरीकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतांना दिसत होता.
या वेळी बोलतांना प्रेरणाताई म्हणाल्या की ही आमच्या मतदार संघातील नागरीकांशी मागिल पस्तीस वर्षा पासून ची सामाजिक बांधिलकी आहे या निमित्ताने का होईना समस्या सोडवल्याचे मनस्वी समाधान वाटते. मतदार संघात फिरत असतांना नागरीकांच्या समस्या सोडण्यास आमचे प्रथम प्राधान्य असते.अजुन ही थोडे काम बाकी आहे. पुल आणि थोडासा रस्ता तेही लवकच पुर्ण करणार असे आश्वासन त्यांनी या वेळी बोलतांना दिले. या वेळी प्रेरणाताई यांनी या रस्त्या साठी सतत प्रयत्नशिल राहिलेल्या आशोक उर्फ पिंटू घुंबरे यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार घुंबरे यांनी मानले तर आभार गजानन घुंबरे यांनी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन वाघ यांनी केले या कार्यक्रमासाठी आदिवासी वसाहती वरील नागरीकां सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते....
0 टिप्पण्या