💥पुर्णा तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्यांपुर्वीच खत विक्रेत्यांकडून अन्नदाता शेतकऱ्यांच्या आर्थिक सोशनास सुरूवात....!


💥खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून खतांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कार्यवाही करा - प्रहार जनशक्ती पक्ष 

 पूर्णा (दि.०६ जुन २०२२) - शहरातील नवा मोंढा परिसरात नफेखोर साठेबाज खत विक्रेत्यांकडून खतांचा अमाप साठा करीत खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत खत तुटवडा दाखवून मान्सुनपुर्व खरीप हंगामातील पेरण्यांना सुरूवात होणार असल्याने अन्नदाता शेतकऱ्यांच्या आर्थिक सोशनासाठी कंबर कसल्याचे निदर्शनास येत असून खत विक्रेते चढ्या भावाने खतांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.


सदरील गभीर बाब प्रहार जनशक्ती पक्षाने पुर्णेचे निद्रिस्त अवस्थेतील तालुका कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली असता अनेक वितरकांकडे पॉझ मशीन आणि उपलब्ध साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्या त्यासोबतच ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर साठेबाज नफेखोर खत विक्रेते खतांचा कृत्रिम तुटवडा दाखवून वितरक लिंक प्रणालीद्वारे काही खतांच्या गोणी बरोबर अनेक प्रकारचे खते व औषधं घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करत आहेत 

सदर गंभीर प्रकाराबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के, युवा तालुका प्रमुख नरेश जोगदंड, शहरप्रमुख संजय वाघमारे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे एक निवेदन दिले असून सदर निवेदनात असे प्रकार करणाऱ्या वितरकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे यां प्रसंगी नवनाथ चेपेले, नागेश जोगदंड, मंचक कुऱ्हे, नितीन कदम, संतोष चिंतामणी जोगदंड,गंगाधर श्यामराव जोगदंड, तुकाराम जोगदंड, यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या