💥अवलिया महाराज संस्थान कळामाथा येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न...!


💥यावेळी आदिवासी समाज,वडार समाज व बौद्ध समाजातील जोडप्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला💥

फुलचंद भगत

वाशिम:-ग्रामविकास क्रीडा कला व आरोग्य बहुउद्देशीय संस्था खडकी ता मालेगाव  चे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे राजुभाऊ जमदाडे ह्यांच्या वतीने दि. १३ जुन रोजी आयोजित केला होता.लग्न कार्यामध्ये होत असलेला अनावश्यक खर्च, बडेजाव ,त्यातून वधु पित्यावर होणारे कर्ज व त्या कर्जापाई होत असलेल्या आत्महत्त्या ह्या बाबींचा विचार करून व ह्याला कुठेतरी पायबंद बसावा म्हणून ह्या सामूहिक विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व मोठ्या संख्येने सर्वधर्मीय जोडप्यांनी आपली लगीन गाठ ह्या  सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये  बांधली आहे.ह्या विवाह सोहळ्यामध्ये बंजारा समाज, आदिवासी समाज, वडार समाज व बौद्ध समाजातील जोडप्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला .

ह्या  विवाह सोहळ्याला चे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ खंडारे, जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई राऊत,जिल्हा परिषद सदस्य सुनील लहाने, वंचित चे ता अध्यक्ष सारनाथ अवचार, जेष्ठ नेते शेख कदिर भाई, मा पंचायत समिती सदस्य प्रकाश गवई, लक्ष्मण सावळे, राजू वैद्य ,डॉ जगदिश राव घुगे, गलपत महाराज,दत्ता राऊत,प्रवीण भगत,शांताराम गिरे, पोलीस पाटील

कांबळे,संतोष भालेराव,सुनील कांबळे,संदीप वानखडे,सुरेश वानखडे,बुद्धम भगत,धनराज आडे ह्यांची उपस्थिती लाभली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या