💥अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ८ ऑगस्ट २०२२ रोजी....!


💥चांदूर रेल्वे येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

चांदूर रेल्वे येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी ची बैठक केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीमध्येअ.भा. पत्रकार संघाचे एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ८ ऑगस्ट ला राम गणेश गडकरी सभागृह, ठाणे येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सचिव अशोक पवार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, प्रदेश सरचिटणीस प्रा.रवींद्र मेंढे,महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगीवकर आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीमध्ये पत्रकारांचे प्रश्न व समस्या यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी अखिल भारतीय पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ८ ऑगस्ट रोजी राम गणेश गडकरी सभागृह,ठाणे येथे आयोजित केले असुन संपूर्ण राज्यातील सर्व पत्रकार मंडळी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगीतले. तर अध्यक्षीय भाषणातून केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांनी अ.भा.ग्रा.पत्रकार संघ पत्रकारांच्या हित व संरक्षणासाठी काम करीत असून पत्रकारांनी या संघटनेत सामील व्हावे असे आवाहन यावेळी केले.

यावेळी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा.रवींद्र मेंढे व जिल्हा कार्यकारिणी सहसचिव धीरज नेवारे यांचा वाढदिवस केक कापून व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उत्साहात साजरा केला. केंद्रीय कार्यकारिणी चे इतर पदाधिकारी झूम मिटींग वरून या बैठकीला उपस्थित होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव गावंडे,जिल्हा सहसचिव धीरज नेवारे,तालुकाध्यक्ष इरफान पठाण,तालुका उपाध्यक्ष मंगेश बोबडे,सचिव राजीव शिवणकर,अमोल गवळी,राजेश सराफी,राहुल देशमुख,विनय गोटफोडे,शहजाद खान,प्रशांत सिसोदिया,मनिष खुने यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या