💥परळी उपविभागीय कार्यालयासमोर शहरातील शेतकरी सहा जून रोजी उपोषणास बसणार - संतोष आदोडे

 


 💥 शेतरस्ता खुला करून देण्याच्या मागणी साठी करणार शेतकरी उपोषण💥    

परळी (दि.०२ जुन २०२२) - परळी उपविभागीय कार्यालयासमोर शहरातील शेतकरी सहा जून रोजी उपोषणास बसणार असल्याची माहिती संतोष आदोडे यांनी दिली आहे.                              

 याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शिवारातील सर्वे नंबर 224 244 249 या सर्वे मधील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता असताना येथील शेतकऱ्यांनी रस्ता अडवला होता त्यासाठी आम्ही दिनांक 9 / 5 2022 रोजी उपोषणाला बसले असता परळी तहसीलदार यांनी सदरील सर्वे नंबर मधील रस्ता मोकळा करून देण्यात यावा असे लेखी मंडळ अधिकारी व तलाठी यांना कळविले असता ही त्यांनी आतापर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज आम्ही संबंधित रस्ता मोकळा करुन द्यावा यासाठी निवेदन दिले देऊन असुन रस्ता लवकरात लवकर रस्ता मोकळा करण्यात यावा अन्यथा सहा जून 2022 रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा संतोष आदोडे यांनी दिला असून या निवेदनावर प्रकाश जुनाळ , नारायण देशमुख संतोष आदोडे जगन्नाथ चव्हाण अमोल रोडे भगवान पवार आश्रोबा पवार चंद्रकांत जुनाळ सुरेश जुनाळ विलास आदोडे यांच्यासह गुरेढोरे जनावरे घेऊन उपविभागीय कार्यालय परळी समोर संतोष आदोडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे  देण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या