💥वंचित बहुजन आघाडीचे बिड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली माहिती💥
परळी (दि.२४ जुन २०२२) - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचे फॉर्म मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे पुर्व बीडजिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना शैक्षणिक वर्ष मार्च २०२१ पासून लागू करण्यात आली असून या वर्षी इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने पुढील दोन वर्षासाठी प्रति एक लाख रुपये याप्रमाणे विशेष अनुदान योजना घोषित केली असून यासाठी लागणारे फॉर्म वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून या मोफत योजनेचा जास्तीत जास्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांच्याशी 96 89 84 71 11 या नंबर वर संपर्क साधून फार्म घेऊन जाण्यात यावे असेही आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे....
0 टिप्पण्या