💥धार रोडवरील कचरा डेपो उठविण्याचे श्रेय प्रहार जनशक्ती पक्षाचेच...!


💥इतरांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये - प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने


परभणी - परभणी शहर महानगरपालिका हक्षित येणान्या थार रोडवरील कचरा डेपो मागील 20 वर्षापासून अनाधिकृत रित्या सुरु असतांना आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केवळ घोषणा केल्या शिवाय हा अनाधिकृत कचरा डेपो बंद करण्याबाबत प्रयत्न केले नाही. परंतु मागील चार महिन्यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाने या विषयावर निवेदने दिले व महाराष्ट्र प्रदूषन मंडळाच्या कार्यालयामध्ये कचरा फेको आंदोलन केले व त्या नंतर राष्ट्रीय हरीत लवाद या न्यायालयाकडे या विषयावर न्यायालयीन लढा दिला.


राष्ट्रीय हरीत लवादा कडील धार रोडवरील कचरा डेपोचा खटला प्रहार जनशक्ती पक्षाने जिंकल्यानंतर महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळाने या बाबत मा. जिल्हाधिकारी, परभणी व ना.आयुक्त, परभणी शहर महानगरपालिका यांना प्रदुषन नियंत्रण मंडळ मुंबई यांच्या कार्यालयामध्ये दि. २९.०४.२०२२ रोजी सुनावणी घेऊन १५ दिवसाच्या आत चार रोडवरील कचरा डेपो हटविण्याबाबत तसेच संबंधीत कचरा डेपो बोरखंड खुर्द येथे नियोजित जागी स्थलांतरीत करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने परभणी शहर महानगरपालिका धार रोडवरील कचरा डेपो हटविण्याचे काम करीत आहे. परंतु काल परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत मा.आमदार साहेबांनी महानगरपालिका सोबत झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये धार रोडवरील कचरा डेपो हटविण्याचा निर्णय झाला असून ०१ जुलै पर्यंत कचरा डेपो हटविण्याबाबत कार्यवाही होईल अशा आशयाच्या बातम्या आज विविध वर्तमानपत्रामध्ये आल्या आहेत.


प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दिनांक १७.०६.२०२२ रोजी हॉटेल सेफ्रॉन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलींग बोधने यांनी प्रहार जनशक्ती पक्षाने धार रोड कचरा डेपो प्रकरणी केलेली कार्यवाही व राष्ट्रीय हरीत लवादामध्ये जिंकलेला न्यायालयीन खटला तसेच या बाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेले आदेशाच्या कागदोपत्री पुराव्यासह धार रोडवरील कचरा डेपो हटविण्याचे श्रेय प्रहार जनशक्ती पक्षाचेच असल्याचे स्पष्ट केले.

याच पत्रकार परिषदेमध्ये शिवलिंग बोधने यांनी शहरातील मनपा कडून सिमेंट रोडवर चुकीच्या पद्धतीने डांबर रस्ते तयार करणे, वसमत रोडवरील दिवे न लावताच झालेले विद्युत खांबंचे उद्घाटन, एका वर्षातच खराब झालेला साडेगांव - परभणी रस्त्यावरून आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्लास्टिक कोटेड रस्ता, मांगणगाव येथील २० वर्षापासून अर्धवट असलेला पूल व धार रोडवरील रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत पोल व अर्धवट रस्ता याबाबत लोकप्रतिनिधींनी बोलणे अपेक्षित आहे. धार रोड वरील अनाधिकृत कचरा डेपो हटविण्याचे श्रेय हे प्रहार जनशक्ती पक्षाचेच असून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आयत्या पिठावर रेघोटया ओढून या प्रकरणाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करु नये असे यावेळी सांगीतले.

या पत्रकार परिषदेस मोठ्या प्रमाणावर पत्रकार बंधू तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके, शहरप्रमुख धर्मेन्द्र तुपसमिंदरे, महिला आघाडी शहरप्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटणीस वैभय संघई , शेख बशीर, विठ्ठल गरुड, हनुमान गरुड, रमेश काळे, उषाताई पातुरकर, गिताताई चोटलिया इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या