💥अवैध धंद्याच्या हप्तेखोरीच्या लालचे पोटी चार लाचखोर पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...!


💥वाशीम जिल्हा पोलिस दलात उडाली एकच खळबळ💥 

फुलचंद भगत

वाशीम :- जिल्हातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याच्या हप्तेखोरिच्या लालचे पोटी चार लाचखोर पोलीस कर्मचारी   एसीबी  जाळ्यात अटकल्यामुळे वाशीम जिल्हात अवैध धंध्याला मुक संमती असल्याचे आजच्या घटने वरून दिसून येत आहे . 

                तक्रारदार यांनी दी.27-05-2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय अमरावती येथे येऊन त्यांना पोलीस स्टेशन आसेगाव येथील पोलीस कर्मचारी श्री गणेश बर्गे हे दुकानांमध्ये रेड करण्याची भीती घालून तक्रारदार यांना दारूचा व जुगार धंदा सुरू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून 10000 रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार दिली.

             सदर तक्रारीची दिनांक 30 /05/2022  रोजी शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पोलीस स्टेशन आसेगाव जिल्हा वाशिम येथे तक्रारदार यांना त्यांचा दारूचा व जुगाराचा धंदा सुरू ठेवण्यासाठी लोकसेवक श्री दिनेश राठोड व श्री रमेश चव्हाण यांनी लोकसेवक श्री गणेश बर्गे यांच्या वतीने एकूण 10,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वत स्वीकारण्याची संमती दर्शवली. तसेच लोकसेवक श्री केदार ( केदारेश्वर) यांनी तक्रारदार यांना अवैध धंदा सुरू करून बिट जमादार यांचे मार्फतीने ठाणेदार यांना भेटण्याकरिता वारंवार तगादा लावून  त्याबाबतचा हप्ता पोलीस स्टेशनला देण्याबाबत प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले त्यावरून आरोपी क्रमांक  1 ) श्री गणेश बर्गे यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपिता विरूद्ध पोस्टे आसेगाव जिल्हा वाशिम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 या करिता मार्गदर्शन मा. श्री विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, व श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.श्री. संजय महाजन पोलीस उपअधीक्षक.ला.प्र.वी.अमरावती सापळा व तपास अधिकारी म्हणून  श्री अमोल कडू, पोलीस निरीक्षक ला.प्र.वी.अमरावती. कारवाई पथक म्हणून श्री.अमोल कडू, पोलीस निरीक्षक, पो.का.शैलेश कडू, ना.पो.का. युवराज राठोड, निलेश महींगे, गजानन शेंडे, रोशन खंडारे,सहापोफौ.सतिश किटूकले आलोसे यांचे सक्षम अधिकारी  मा. पोलीस अधीक्षक वाशिम यांचे सहकार्य मिळाले आहे .

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ 

पोलीस उप अधीक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती  

दुरध्वनी क्रं -  0721 2552355

टोल फ्रि क्रं 1064 या वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या