💥सेनगाव तालुक्यातील साखरा येथील माळाच्या मारोतीकडे पाऊस पड़ाव म्हनूण ग्रामस्थाचे साकडे....!


💥या ठिकाणी आज महाप्रसाद देखील वाटप करण्यात आला💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

पावसाळा चालू होऊन सुमारे आज 30 दिवस झाले मात्र अद्यापही साखरा परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालाच नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या पेरन्या खोळंबल्या आहेत जिल्हातील अनेक गावातील पेरन्या जवळपास आटोपल्या आहेत मात्र साखरा .हिवरखेडा .धोतरा .खडकी केलसुला .उटी ब्रम्हचारी या सह सेनगाव तालुक्यातील आदी गावातील पेरण्या खोळंबल्या आहेत  पाऊस पड़ाव म्हनूण साखरा येथील ग्रामस्थाच्या वतीने साखरा येथील माळाच्या मारोतीकडे साकडे घालण्यात आले आहें व या ठिकाणी आज महाप्रसाद देखिल वाटप करण्यात आला आहें.


गेल्या कित्येक दिवसा पासून आजू बाजू सर्वच गावात पाऊस पडत आहें मात्र साखरा मंडळात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलाच नाही शेतात अजुन हि ढेकळे तसेंच आहेत त्यामुळे आत्ता शेतकरी राज्या चिंतेत आहें त्यामुळे साखरा येथील ग्रामस्थाच्या वतीने आज महाप्रसादाचे आयोजन करून देवा कडे साकडे घातले आहें लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि माज्या शेतकरी राज्याच्या पेरण्या लवकरात लवकर व्हावे असे मागील देवा कडे करण्यात आली आहें....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या