💥परभणी तालुक्यातील मौ.वाडीदमई येथे कृषी संजीवनी महोत्सव संपन्न....!💥शेतकरी महिलांनी सक्ष्मीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज - डॉ.गजानन गडदे

परभणी (दि.२७ जुन २०२२) - तालुक्यातील मौ.वाडीदमई येथे आज सोमवार दि.२७ जून २०२२ रोजी कृषी संजीवनी महोत्सव घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ म्हणून लाभलेले डॉ. गजानन गडदे विस्तार कृषी विद्यावेत्ता वनामकृवि परभणी, यांनी आज कृषी संजीवनी मोहिमेचा विषय महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण महिला चर्चासत्र आणि प्रशिक्षण सोयाबीन लागवड तंत्रज्ञान महिलांची शेतीशाळा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं.


या शेतीशाळेमध्ये महिलांना बीज प्रक्रिये पासून ते काढणी साठवणुकीपर्यंत आणि बीबीएफ तंत्रज्ञानाचा व अवलंब करण्याचे आव्हान शेतकरी महिलांना डॉ.गडदे यांनी केले, शेतकरी महिला कशा सक्षम होतील यासाठी प्रक्रिया उद्योग, गृह उद्योग, महिलांच्या सहली, अभ्यासदौरे, प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ आपल्या जिल्ह्यात आहे याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी द्यायलाच पाहिजे असे आव्हान डॉ.गडदे यांनी केले महिला सक्षमीकरणासाठी छोटे गृह उद्योग सुरू करण्यापासून ते मोठ्या उद्योगा पर्यंत कसे नेता येतील आणि खते, बियाणे, बियाण्याची निवड याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केलं,श्रीमती. स्वाती घोडके यांनी महिलांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत महिला गटस्थापन करून महिलांनी गृह उद्योग करून स्वतःची ओळख निर्माण करावी, तसेच गटस्थापन करण्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच महिलांना शेतकामासाठी शेतकऱ्यासाठी येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच श्रीमती. सुप्रिया धबाले संकटग्रस्त महिला निवारण केंद्र सदस्य वन स्टॉप सेंटर यांनी महिलांना महिला निवारण केंद्र विषयी सविस्तर माहिती संगीतलि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. एस. जे. आनेराव कृषी सहाय्यक यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषी पर्यवेक्षक श्री. बी. एम. मुंडे कृषी सहाय्यक श्री. एस. जे. आनेराव श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी श्रीमती राधा कदम संकटग्रस्त महिला निवारण केंद्र सदस्य,या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेल्या लताबाई तरटे सरपंच वाडी दमाई,विश्वनाथ तरटे उपसरपंच,लक्ष्मण बिडकर पोलीस पाटील,उत्तमराव तरोटे,बाळासाहेब गायकवाड,दत्तराव गायकवाड,प्रकाश तरोटे, मुंजाजी गायकवाड,गवण मोगरे, प्रगतशील महिला शेतकरी अनुराधाताई, अनिताताई इत्यादी महिला सदस्य उपस्थित होत्या, कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ अधिकारी कर्मचारी शेतकरी महिला शेतकरी पुरुष गावचे सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी या सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला या कृषी संजीवनी मधून सर्व गावकरी मंडळींना खूप मोलाच अस मार्गदर्शन मिळाले आजच्या महिला कृषी तंत्रज्ञान महिला सक्षमीकरण चर्चासत्र या कार्यक्रमाला तब्बल 60महिला आणि 28 पुरुष वर्ग उपस्थित राहून मार्गदर्शन घेतले असे एकूण 88 लोकांनी या कार्यक्रमा साठी गटातील महिला शेतकरी व स्वाती घोडके आदींनी परिश्रम घेतले...,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या