💥पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी गाव तिथे शाखा व घर तिथे प्रहार सेवक निर्माण करण्याचा केला संकल्प 💥
परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सध्या परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात संघटन वाढविण्यावर भर दिला जात असून पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी गाव तिथे शाखा व घर तिथे प्रहार सेवक संकल्प केला असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही अभिनव योजना राबविण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून आज परभणी तालुक्यातील जोड परळी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे व महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शाखा नामफलक अनावरण कार्यक्रमावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी परभणी जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महानगर पालिका निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढविणार असून पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धनदांडग्या निष्क्रिय लोकांना जनता जनर्धनाच्या आशीर्वादाने त्यांची जागा दाखवून जनसामान्य जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या मा.ना. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढू आणि जिंकू असा विश्वास या वेळी व्यक्त केला.
*जोड परळी शाखा कार्यकारणी खालील प्रमाणे -*
शाखा प्रमुख - सुरेश काळे
उपशाखा प्रमुख - योगेश काळे
शाखा सचिव - प्रल्हाद काळे
शाखा उपसचिव - राजू मा. काळे
शाखा कोषाध्यक्ष - राजेंद्र काळे
शाखा सदस्य - संतोष आगलावे, धोंडीबा ( पिंटू ) सुरवसे, युवराज गरुड, सागर काळे, अनिल पडोळे, पवन काळे, ओंकार काळे, भीमराव राऊत, लक्षिमन भालेराव, दत्तराव काळे, कृष्णा काळे, गजानन एडके, रामचंद्र काळे, प्रसाद काळे
कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जोड परळी सर्कल प्रमुख ज्ञानोबा काळे, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर चिटणीस वैभव संघई, महिला आघाडी शहर प्रमुख अर्चनाताई झुमडे, दत्तराव रवंदळे, प्रशांत घुंबरे, सुमित इंगोले, गणेश भुजंग काळे, ज्ञानेश्वर काळे, भगवान सुदामराव काळे, सुनील पडोळे, सोपान काळे, विठ्ठल कदम, दीपक काळे, भागवत काळे, प्रसाद काळे, गणेशराव काळे, रोहिदास भानुदास काळे, रोहिदास आगलावे, नारायण काळे, लहू काळे, गणेश संतोषराव काळे, मुंजा काळे इत्यादी सह गावातील तरुण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 टिप्पण्या