💥पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील चुडावा नऱ्हापूरच्या मध्यभागी भिषण अपघात ; अपघातात पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू....!


💥रस्त्याच्या बाजुला असलेल्या किलोमिटरच्या दगडाला कार धडकून तिन वेळा पलटी झाल्याने झाला भयंकर अपघात💥

पुर्णा (दि.२४ जुन २०२२) - पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील अपघातांची सातत्याने सुरूच असून आज शुक्रवार दि.२४ जुन २०२२ रोजी याच मार्गावरील चुडावा-नऱ्हापूर दरम्यान असलेल्या नवीन पुलाजवळ नांदेडहून पुर्णेकडे येणाऱ्या वेगनार कार क्र.एम.एच.१२ टि.वाय ३७६३ या समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवतांना कार किलोमीटरच्या दगडाला धडकून तिन वेळेस पलटी होऊन झालेल्या भिषण अपघातात चुडावा पोलिस स्थानकात कर्तव्यावर असलेले सहा.पोलिस उपनिरिक्षक छगन किशनराव सोनवने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की चुडावा पोलिस कार्यरत एएसआय छगन किशनराव सोनवाने यांना नुकतीच सहा.पोलिस उपनिरिक्षक (ग्रेट पिएसआय) पदावर पदोन्नती मिळाल्याने ते आज शुक्रवार दि.२४ जुन रोजी नांदेड येथे नवीन युनिफाम घेण्यासाठी त्यांच्या वेगनआर कारणे गेले होते नांदेडहून येत असतांना सायं.५-०० वाजेच्या सुमारास येत असतांना चुडावा-नऱ्हापूरच्या दरम्यान नवीन पुलालगत समोरील दुचाकीला वाचवतांना रस्त्याच्या कडला असलेल्या किलोमिटरच्या दगडावर कार धडकल्याने कार तिन वेळेस पलटी होऊन झालेल्या भिषण अपघातात सहा.पोलिस उपनिरिक्षक छगन सोनवने यांचा जागेवरच मृत्यू झाला या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला त्यांच्या अपघाती मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुल आई व दोन भाऊ असा परिवार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या