💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - पुर्णा शहर लोकल न्युज अपडेट्स.....!

 


💥पुर्णेतील नामांकीत शिक्षण संस्था चालकांची मनमानी :  अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात💥

१) पुर्णेतील नामांकीत शिक्षण संस्था चालकांची मनमानी : कोरोना महामारी काळात विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचे आदेश असतांनाही स्वतःच्याच संस्थेतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यास टाळाटाळ अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात....

२) पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील मोठ्या नाल्यांसह शहरातील विविध भागातल्या नाल्यांच्या स्वच्छतेसह जागोजाग साचलेल्या कचऱ्यांची ढिगार साफ करण्याकडे सपशेल दुर्लक्ष...

३) पुर्णा तालुक्यात पावसाने उशीरा हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना झाली उशीरा सुरूवात...

४) पुर्णा-नांदेड राज्य मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले : या मार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी/चारचाकी वाहन धारकांमुळे या मार्गावरील गावकरी शेतकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांना वावरावे लागत आहे जिव मुठ्ठीत धरून महिण्यातून होत आहेत चार/पाच अपघात.... 

५) पुर्णा शहरातील जुना मोंढा परिसरातील विद्युत सुशोभिकरण औटघटकेचे : अल्पकालावधीतच अनेक खांबावरील लाईट पडली बंद : या परिसरातील भाजीपाला विक्रेते फळ विक्रेत्यांना करावा लागतोय अंधाराचा सामना....

६) पुर्णा शहरातील लोकमान्य टिळकरोड,स्वामी दयानंद सरस्वती चौक,महाविर नगर,रेल्वे स्थानक परिसर,सुमन मंगल कार्यालय परिसरात दररोज मद्यपींचा हैदोस परिसरातील रहिवासी नागरिक व्यापारी झाले त्रस्त....

७) पुर्णेत कृषी केंद्र चालकांकडून बि-बियान/खतांची अतिरिक्त दराने विक्री शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक : तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष...

८) पुर्णा शहर शिवसेना प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांनी हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे शिवसैनिकांना केले आवाहन...

९) पुर्णेत महाराष्ट्र राज्य विद्युत महाविरण कडून अघोषीत लोडशेडींगला सुरूवात ? दोन/तिन तास लाईट गुल होत असल्यामुळे नागरिक त्रस्त...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या