💥औरंगाबाद-नांदेड महामार्गावर रायखेडा गावाजवळ ट्रक पलटी....!


💥अपघातात सुदैवाने कुठलीच जीवित हानी नाही💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर : औरंगाबाद-नांदेड महामार्गावर जिंतूर तालुक्यातील रायखेडा गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानेहा अपघात झाल्याचे कळले. 

         सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील रायखेडा गावाजवळ ट्रक पलटी झाल्याची घटना दि. २१ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. औरंगाबाद हुन नांदेड कडे जात असताना रायखेडा पाटीजवळ ट्रक क्र. ए. पी. ३९ टी. एस. ५६८८ ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला छोट्या पुलाहुन  खाली पडला. गावाजवळ नागरिकांची नेहमी  वर्दळ असते पण सुदैवाने या अपघातात ट्रक चालक व ट्रक वाहक या सह कुणालाच काही इजा झाली नाही.  ट्रक अपघाताची माहिती मिळताच महामार्ग चे पोलीस अंमलदार शेख शकील हे तात्काळ जाऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी ट्रक पलटी झाल्याची बातमी कळताच गावातील  नागरिकांनी या अपघात स्थळी गर्दी झाली होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या