💥डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना....!


💥मुस्लिम बांधवांच्या मुलांना इस्लाम समजून घेण्यासाठी मुस्लिम धर्मात मदरसा हे महत्वाचे माध्यम💥

             मुस्लिम समाजातील चालीरीती. परंपरा. संस्कृती. नमाजपठण. इलम. यांचें पूर्णपणे शिक्षण घेण्यासाठी एक मुस्लिम समाजाच्या वतीने गोरगरीब आणि जे शिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. ज्या मुस्लिम बांधवांच्या मुलांना इस्लाम समजून घेण्यासाठी मुस्लिम धर्मात मदरसा हे महत्वाचे माध्यम आहे 

        अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अ वि वि.२०१०/ प्र क्र/१५२/ १०/ का -६ मादामा कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०००३२ तारीख ११ आकटोंबर २०१३ रोजी  डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना मुस्लिम धर्मासाठी एक संजिवनी म्हणून जारी करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने गठीत केलेल्या न्या सचचर समितीने या समाजाची शैक्षणिक व आर्थिक स्थिती अंत्यंत हालाखीची असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आले. तसेच मदरसा मध्ये शिक्षण घेणारी मुल बहुतांशी मुल अंत्यंत गरिब कुटुंबातील आहेत.या दृष्टीने मा. पंतप्रधान नवीन १५ कलमी कार्यक्रमाअंतर्गत कलम ४ चे अनुषंगाने राज्यातील अल्पसंख्याकाचा शैक्षणिक विकास आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात विज्ञान.गणित. समाजशास्त्र. हिंदी. मराठी. इंग्रजी. व उर्दू हे विषय शिकविण्यासाठी तसेच मदरसाना पायाभूत सुविधांसाठी व मुलांना नवीन नवीन पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयासाठी अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यामुळे शासनाने ११ आकटोबर २०१३ रोजी शासननिर्णय जारी केला 

     मदरसा मध्ये शिकत व शिक्षण घेत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान. गणित. समाजशास्त्र. हिंदी. मराठी. इंग्रजी. उर्दू. या विषयाचे शिक्षण देणें गरजेचे आहे मुख्य प्रवाहातील मदरसा मध्ये प्रवेश घेणा-या इ ९वी . इयत्ता १० वी. ११ वी. व १२ वी तील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते मध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढवून आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल या उद्देशाने मदरशांच्या आधुनिकीकरण करण्यासाठी पायाभूत सेवा सुविधा ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यासाठी डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली 

         राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वफत बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदरसा नोंदणी करून तीन वर्ष पूर्ण झालेल्या तसेच अल्पसंख्याक बहुल जिल्ह्यातील व तालुक्यातील मदरशांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे ‌तयानुसार प्रथम वर्षी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या २०० मदरशांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.सदरहू योजनेअंतर्गत मदरसांना खालील प्रमाणे तीन महत्वाच्या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल असा शासन आदेश सांगतो . 

           राज्यातील धर्मादाय आयुक्त वफत बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांना खालील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त रुपये २ लाख इतक्या मर्यादे पर्यंत अनुदान दिले जाईल.

(१) मदरसा इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी

(२) पेय जल स्वच्छ व्यवस्था करणे

(३) प्रसाधान गृह वेगवेगळे उभारणे व त्याची स्वच्छता व डागडुजी करणे

(४) मुलांना वर्गात शिकण्यासाठी आवश्यक फर्निचर

(५) मदरसा निवास स्थानात इन्व्हर्टर ची सुविधा उपलब्ध करणे

(६) मदरसा इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी

(७) संगणक. हार्डवेअर.साॅफटवेअर प्रिंटरस

(८) प्रयोगशाळा साहित्य. सायन्स किट. मॅथमॅटीकसकिट.व इतर अध्ययन साहित्य

      वरील पायाभूत सुविधा व प्रयोजनासाठी फक्त आणि फक्त एकदाचं अनुदान दिले जाईल.तथापी मदरशांचे इमारतींचे आकारमान. क्षेत्रफळ तसेच विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता गतवर्षी निर्माण केलेल्या सुविधा अपुरया पडत असल्याचे योग्य समर्थन प्रस्तावात नमूद केल्यास अशा अपवादात्मक परिस्थितीत पुन्हा त्याच सुविधांसाठी मागणी केलेलें प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीसमोर विचारार्थ ठेवण्यात येतील निवड समिती प्रस्तावातील समर्थन विचारांत घेऊन योग्य निर्णय घेईल याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

      याशिवाय ग्रंथालय यासाठी व प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संच देण्यासाठी बुक बॅंक सुविधा पुरविण्यासाठी तसेच प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक खर्च साहित्य. कंपास बॉक्स. इ. उपलब्ध करून देण्यासाठी एका मदरशाला एकदाचं रूपये ५०.००० अनुदान उपलब्ध करून दिले जाते.  तदनंतर प्रति वर्षी रूपये ५.००० इतके अनुदान यासाठी दिलें जाते. 

         मदरसां मध्ये नेमण्यात येणारया शिक्षकांचे मानधन देण्यासाठी राज्यातील नोंदणीकृत मदरसांमधये पारंपरिक. धार्मिक . शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आणि वयोगटानुसार धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान. गणित. समाजशास्त्र.हिंदी . मराठी. इंग्रजी. उर्दू.या विषयांचे शिक्षण देण्यासाठी . डी.एड.  अथवा बी. एड. शिक्षक नेमण्यात येतील आणि त्यांना खालील प्रमाणे शासन नियमानुसार मानधन देण्यात येईल. प्रत्येक मदरसा मध्ये नियुक्त केलेल्या जास्तीत जास्त ३ शिक्षकांचे मानधन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत देण्यात येईल. 

(१)  ६/१२ वयोगटातील विद्यार्थ्यांना वरील विषय शिकविण्यासाठी डी.एड. शिक्षक कंत्राटी पध्दतीने नेमण्यात येतील आणि त्यांना रूपये ६.०००/ प्रति महिना मानधन देण्यात येईल

(२)  १३/१८ वयोगटातील विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरील विषय शिकविण्यासाठी बी.ए. बी. एड. आणि बी. एस. सी .एड. शिक्षक कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येतील आणि त्यांना प्रत्येक रूपये ८०००/प्रति महिना मानधन देण्यात येईल

(३) कमीत कमी २० विद्यार्थी असतील अशा मदरसांना यांचा लाभ देण्यात येईल

(४) विद्यार्थी व शिक्षक यांचें प्रमाण ४०:१ असे राहील

(५) मदरसां मध्ये १३/१८ वयोगटातील ४० किंवा ४० पेक्षा कमी मुलं असतील तर एक शिक्षक ( बी.ए.बी. एड / बी. एस सी . बी. एड ) नेमण्यात येईल व दुसरा शिक्षक अभ्यागत पध्दतीने प्रति तास रु २०० प्रमाणे वर्षातील ३०० तासांसाठी नेमण्यात येईल

(६) सधसथिती उपरोक्त अर्हता प्राप्त कार्यरत असणारे मान्यताप्राप्त इतर शाळांमधील ज्येष्ठ शिक्षकांनी इचछूकता दरशविलयास मदरसा मध्ये शिकविण्यासाठी त्यांना प्रति तास रु २०० प्रमाणे मानधन देण्यात येईल

(७) सदर योजनेअंतर्गत उत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती संबंधित मदरसा चालविणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येईल.टी.ई. टी. शिक्षक उपलब्ध न जाओ बी.एस. सी. बी एड. बी ए‌. इडी. डी. इडी. शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.

(८)  वरील विषय शिकविण्यासाठी संस्थाचालक मराठी. उर्दू.  इंग्रजी. हिंदी. यापैकी एका माध्यमांची निवड करतील व त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करण्यात येईल. 

   बाकीची माहिती उद्या

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष 

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या