💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संचालक तथा जेष्ठ पत्रकार दिपक राजूरकर होते💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयात सोमवार दिनांक ६ जून रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्य बालवाचकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व्यख्यान,ग्रंथ प्रदर्शन आदी कार्यक्रमही संपन्न झाले.
ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी परभणी यांच्या परिपत्रकानुसार सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी 11 वाजता कै. जयकुमारजी जैन वाचनालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संचालक तथा जेष्ठ पत्रकार दिपक राजूरकर होते.सौ.मीना जैन,मराठवाड्याचे युवा वक्ते विशाल देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
प्रारंभी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले."लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवराय व "शिवरायांचे स्वराज्य आणि आजचा महाराष्ट्र "या दोन विषयावर विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घेण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या इतिहासावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली विजेत्या स्पर्धकांना एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व डिजीटल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
मराठवाड्याचे युवा वक्ते विशाल देशमुख यांनी "शिवस्वराज्य दिन..इतिहासातील सुवर्णक्षण "या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले कि, शिवजयंती आली की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. अश्या विविध पोस्ट समाजमाध्यमांवर वाचायला मिळतात. केवळ अशा पोस्ट टाकून जयंती साजरी होत नसते, यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आचरणात आणणे गरजेचे आहे. महाराजांनी आयुष्यभर व्यसनाला आपल्या पासून कोसो दूर ठेवले. मात्र त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण व्यसन करतो हे आता कुठ तरी थांबलं पाहिजे असे सांगून श्री देशमुख पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत आता मात्र दररोज आत्महत्या होत आहेत, याचे कारण शोधून शासनाने त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी केले....
0 टिप्पण्या