💥एकीकडे शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीने महाराष्ट्र हादरला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांबाबतही संभ्रम ?


💥चर्चेला उधाण :आम्ही अजन्म मातोश्री सोबत या खासदारांनी केली घोषणा💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली - सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील हालचालीमुळे सर्वसामान्य नागरिक व पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. महाविकास आघाडीत सुद्धा अस्वस्थता पसरली दिसून येते. आमदारांच्या बंडखोरी नंतर महाराष्ट्र हादरलेला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांनी बाबतही चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात  हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता  मी आजन्म मातोश्री सोबतच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की, माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला पक्षाने खूप काही दिले आहे.त्यामुळे आपण आजन्म शिवसेनेसोबतच राहणार आहोत,अशी प्रतिक्रिया  खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना पक्षाचे अनेक आमदार व मंत्र्यांनी पक्षविरोधात बंड केले आहे.

 या अनुषंगाने शिवसेनेचे खासदार हेमेंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याची वृत्त चर्चा सुरू होती. मात्र खात्री करण्यासाठी त्यांच्याशी विचारणा केली असता बोलताना खा.पाटील म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने खूप काही दिले आहे.आपल्यासोबत काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आज कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत,याची आपणास जाण आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने आपणास काय दिले आहे,याचाच विचार मनात असतो.पक्षाने आतापर्यंत दिलेल्या संधीबद्दल मी समाधानी आहे.त्यामुळे आजन्म आपण शिवसेनेसोबतच राहणार आहोत.

 दुसरा कोणताही विचार मनामध्ये येणार नाही.ज्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले आहे,त्या शिवसैनिकांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत,त्यांना सन्मान मिळाला पाहिजे,यासाठीच आपण काम करीत आहोत.सद्या ते मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. राजकीय वर्तुळातील हालचाली नंतर मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष पाटील यांच्या निर्णयाकडे लागले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या