💥जिंतूर तालुक्यातील मागासवर्गीयांचे प्रश्न व विविध योजनांची माहिती नसता लवकरच आंदोलन...!

 


💥रिपब्लिकन सेनेचा प्रशासनाला इशारा💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिल्हा परिषद अंतर्गत मागास्वर्गिय समाजाच्या विकासासाठी शासनाकडुन विविध योजना दिल्या जातात. त्याचप्रमाणे पिठाची गिरणी, शिलाई मशिन, रमाई घरकुल आवास योजेनेचे प्रस्ताव प्रशासनाने पंचायत समिती जिंतुर  येथे फाईल भरुन घेतल्या, परंतु आजून पर्यंत या योजनेचा निधी शासनाकडे पडून आसून अद्याप या फाईल निकाली न काढल्यामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत.

संबधित विभागाची तात्काळ बैठक बोलावून  प्रश्न निकाली काढावा व मागास्वर्गिय लाभार्थी यांना न्याय द्यावा अन्यथा  तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा आज बुधवारी  रिपब्लिकन सेना शाखा जिंतुरच्या वतीने  गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष शरद चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या