💥परळीत वंचित बहुजन आघाडी ही निवडणुकीच्या रिंगणात रविवारी बैठकीचे आयोजन....!


💥अशी माहिती बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे💥                                          

परळी (दि.१० जुन २०२२) - वंचित बहुजन आघाडी ही निवडणुकीच्या रिंगणात रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यातील गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व व दाखवून दिलेल्या वंचित बहुजन आघाडीने परळी नगरपालिकेच्या 17 प्रभागात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 12 6 2022 रोजी दुपारी चार वाजता जिजामाता उद्यान येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली बीड लोकसभा मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराने 90 हजार मते मिळविली त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पले बर्‍यापैकी अस्तित्व दाखवून दिले. वंचित आपल्या दारी हा कार्यक्रम पक्षातर्फे लवकरच राबविला जाणार असून कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार असून नगरपालिकेचे निगडित असलेल्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी ते थेट कार्यालयात त्या लोकांसह जाऊन बहुतेक समस्या सोडविल्या नंतर तेथून बाहेर पडताच अशाप्रकारे पक्षाचे काम झोपडपट्टी व वस्त्यांमध्ये वाढविण्यावर पक्षातर्फे भर दिला जाणार असून शहरात जवळपास 17 वार्डात प्रभागात उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे परळी मध्ये बरेच मतदान असल्याचे स्पष्ट झाले आहे त्या निवडणुकीपूर्वी आमची फारशी तयारी झालेली नव्हती आता प्रभाग निहाय कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आहे वस्ती पातळीवर केलेल्या कामाचा आधार घेत आमचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला परळी शहरातील सर्व प्रभागा वर वंचित बहुजन आघाडी ने लक्ष केंद्रित केले असून या भागातील भीम नगर मिलिंद नगर इंद्रा नगर नागसेन नगर पंचशील नगर मोहम्मदिया कॉलनी बरकत नगर बंगला गल्ली ाठिकाणी आघाडीच्या कार्यकर्त्यांची संख्याही अधिक आहे त्यातील प्रमुख कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची स्थिती निर्माण झाल्यास काही प्रभागात बंडखोरी होण्याची शक्यता आहे असे काही उमेदवार शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडी कडे धाव घेण्याची शक्‍यता आहे का गाडीमध्ये आंबेडकर चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत विविध लहान-मोठ्या संघटनाचे कार्यकर्ते हे आघाडीत आहेत अनुसूचित जाती ओबीसी मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी उमेदवारी दिल्याने समाजाचा मोठा घटक वंचित बहुजन आघाडी कडे वळाला आहे विविध आंदोलने व समाज घटकाचे मेळावे घेत संघटना मजबूत करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे विविध प्रभागात लढताना वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांमुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत याची प्रचिती काही प्रभागात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नगरपालिकेत निवडणूक जावेत यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी आदी प्रयत्नशील राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवले असून याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 12 सहा दोन हजार बावीस रोजी ठीक चार वाजता जिजामाता उद्यान येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून परळी शहरातील जिल्हा पदाधिकारी तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी व इच्छुक उमेदवार हितचिंतक इत्यादींनी उपस्थित रहावे असेही आव्हान वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी चे प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या