💥अशी मागणी गंगाखेड काँग्रेस तालुकाध्यक्ष गोंविद यादव एम.बी.भिसे यांनी आयुक्त शिक्षण सुरज मांढरेंची भेट घेऊन केली💥
गंगाखेडःप्रतिनिधी
परभणी जिल्हातील खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक विभागात मागील बॕकडेट मध्ये नियमाबाह्य शिक्षक भरतीचा माध्यमातून कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून शासनाची अर्थीक फसवणूक करणाऱ्या शिक्षण अधिकारी श्रीमती आशा गरूड विठ्ठल भुसारे यांचा सह त्यांना पाठीशी घालणाऱ्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सह आरोपी करण्याची मागणी गंगाखेड तालुका काॕग्रेस अध्यक्ष गोंविद यादव एम.बी.भिसे यांनी आयुक्त शिक्षण सुरज मांढरे यांची भेट घेऊन केली आहे.
परभणी जिल्यातील खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक विभागात 400 च्यावर नियमाबाह्य करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रकरणात वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य, शालार्थ आय डी, ची प्रकरणे आहेत.जिल्हा परिषद माध्यमिक विभागात बोगस बॅक डेटेड, बनावट जावक नंबरने वरच्या वर दस्तावेज बनवून ही लूटमार करण्यात आली आहे. बनावट दस्तावेज बनवून फसवणूकसाठी असणार्या भादवि विविध कलमांखाली एफ आय आर दाखल करून शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड विठ्ठल भुसारे वेतन निश्चिती अधिकारी देशमुख प्राथमिक वेतन अधिक्षक भातलवंदे माध्यमिक वेतन अधिक्षक सानप सह शालार्थ आयडी देणारे विभागीय शिक्षण उपसंचालक यांचावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आसता आयुक्त शिक्षण सुरज मांढरे संपूर्ण प्रकणाबाबत चर्चा करण्यात आली या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणुन शिक्षण उपसंचालक अनील साबळे यांची नियुक्ती केली आसताना त्यांनी इतरांना चौकशी करण्याचा आदेश काढणे म्हणजे चुकीचा आसल्याचे सांगण्यात येऊन शिक्षणाधिकारी यांची चौकशी करणारा शिक्षणाधिकारी तो पण निरतंरचा कसा करणार ?प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात लाॕकडाऊन काळात संपूर्ण भारत बंद आसताना फक्त परभणी शिक्षण विभाग नियमबाह्य शिक्षक भरतीचा कामात व्यस्त होता सन 2020-21 मध्ये बॕकडेट टाकून बोगस जावक नंबर लावून शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतां,सेवा सातत्याचे बनावट दस्तावेज तयार करत होता या घाईचा प्रस्तावात बॕकडेट मधील शिक्षणाधिकारी यांचा बनावट सह्या करण्यात आल्या असे बनावट दस्तावेज घेवून नोकरी पक्की करू पाहणारे शिक्षक व बोगस दस्तावेज बनविण्याचा फर्जीवाडा चालविणारे शिक्षणाधिकारी अद्याप मोकाट कसे? कोण त्यांना अभय देत आहे? कोण त्यांना वाचवित आहे ? असा प्रश्न आयुक्त शिक्षण सुरज मांढरे यांना करण्यात आला या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही निश्चित करण्यात येईल असे अश्वाशन आयुक्त शिक्षण सुरज मांढरे यांनी दिले....
0 टिप्पण्या