💥आडनावांच्या आधारे ओबीसींचा इम्पेरीकल डेटा गोळा करणे तात्काळ थांबवा - डॉ नागोराव जांबूतकर


💥शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

अखिल भारतीय महात्मा  समता परिषदेने दीले निवेदन ओबीसी इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेप्रमाणे व्हावा या करीता सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केले नुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे सदर आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती परंतु आमचे असे निदर्शनास आले आहे की आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअर द्वारे आडनावा नुसार चूकीच्या पद्धतीने माहिती संकलित करीत आहे ही समस्त  ओबीसी समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय ,आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे करिता महोदयांना विनंती की समर्पित आयोगा द्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासना मार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे या आशयाचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे  हिंगोली जील्हा अध्यक्ष नागोराव जांबूतकर यांच्या नेत्रत्वात  ऊपविभागीय अधीकारी वसमत यांना देन्यात आले आहे या प्रसंगी अ भा महात्मा फुले समता परिषदेचे जील्हा अध्यक्ष डॉ नागोराव जांबूतकर,   प्रा डॉ संदीप गोरे,प्रा गायकवाड,मीरपासे, सारंग,विजय कडतन,नवनाथ राऊत, बालाजी मस्के,यशवंत लेकूळे नागोराव लेकूळे,गोविंद सारंग व ईतर कार्यकर्ते ऊपस्थीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या