💥औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर स्टेशन जवळील भानवाडी शिवारात धावत्या रेल्वेतून पडून एका ४७ वर्षाच्या इसमाचा मृत्यू....!


💥या घटनेची नोंद शिल्लेगाव पोलीस स्थानकात (औरंगाबाद ग्रामीण) येथे करण्यात आली आहे💥

23 जून 22 लासुर स्टेशन 

औरंगाबाद : जिल्ह्यातील लासुर स्टेशन जवळील भानवाडी शिवारात रेल्वे किमी ७७/ ०-१ या ठिकाणी धावत्या रेल्वे तुन पडून एका ४७ वर्षीय प्रवासी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मयत इसमाच्या खिशात म्हैसूरच्या जेएसएस हॉस्पिटलची दि.२८ मे २०२२ रोजी उपचार केल्याची पावती  (कर्नाटक राज्य) तसेच मेवानगर बाडमेर जिल्हा (राजस्थान) येथील श्री जैन श्वेतांबर हॉस्पिटल येथील औषध उपचाराची दि.१८ जून २२ रोजीची पावती मिळून आलेली आहे पावती प्रमाणे मयत इसमाचे नाव महेश वय ४७ वर्ष इतकीच ओळख मिळून आलेली आहे

या घटनेची नोंद शिल्लेगाव पोलीस स्थानकात (औरंगाबाद ग्रामीण) येथे असून नातेवाईक यांनी हेडकॉन्स्टेबल अनिल दाभाडे मो.नं.9923150352 किंवा रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी मो नं 9158888159 , 9673008621 यावर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांनी केले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या