💥"खेलो इंडिया" मध्ये दोन पदकांची कमाई केलेल्या परभणीच्या संघाचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत...!


💥परभणी रेल्वे स्टेशन वर विजेत्या खेळाडूंचे आगमन होताच येथील क्रीडा प्रेमी जनतेने बॅन्ड वाजवून स्वागत केले💥

परभणी - 'खेलो इंडिया 'च्या राष्ट्रीय पातळीवरील"गतका" या क्रिडा प्रकारात परभणी च्या  संघाची पहिल्यांदाच झालेली निवड, दोन पदकांची कमाई करत सार्थ ठरवुन, विजयश्री प्राप्त करून आलेल्या विजयी संघाचे परभणी रेल्वे स्टेशन वर आगमन होताच ढोल ताशा च्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.

हरियाणा राज्यातील पंचकुला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील " खेलो इंडिया " युथ गेम्स मध्ये पहिल्यांदाच समावेश झालेल्या "गतका "प्रकारात परभणी मधील पाच मुलींनी पदकं प्राप्त करून परभणी ची शान वाढवली आहे.गतका(सोटी-फरी सांघिक)या क्रिडा प्रकारात एक कास्य पदक प्राप्त झाले आहे, यामध्ये शुभांगी अंभुरे, जान्हवी खिस्ते, नंदिनी पारधे,सिमा खिस्ते या परभणी च्या मुलींनी हे पदक पटकावले आहे, तसेच सिंगल स्टिक या क्रिडा प्रकारात विजया लक्ष्मी पिंपरीकर हिने कास्य पदक प्राप्त केले आहे, या सर्व खेळाडूंना मास्टर पांडुरंग अंभुरे या परभणीच्याच ' कोच ' नी प्रशिक्षण दिले आहे ही परभणीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.खेलो इंडिया मधील सहभागाने परभणी च्या क्रिडा जगतात मानाचा तुरा खोवला गेला आहे.आज दि.१० जुनं २०२२ रोजी सकाळी सात वाजता परभणी रेल्वे स्टेशन वर विजेत्या खेळाडूंचे आगमन होताच परभणी मधील क्रीडा प्रेमी जनतेने बॅन्ड वाजवून स्वागत केले, या वेळी इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे परभणी जिल्हा अध्यक्ष , जेष्ठ पत्रकार मदन (बापु) कोल्हे यांनी परभणी जिल्ह्याला दोन पदक मिळवून दिल्या बद्दल कोच, मास्टर पांडुरंग अंभुरे यांचा सत्कार केला.नंतर विजयी खेळाडूंची मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छ.शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले यांना वंदन करून सुपर मार्केट भागात आल्यावर तेथील स्थानिक महिलांनी ओवाळून खेळाडूंचे स्वागत केले, तसेच शिवाजी गॅस सर्विस  चे मालक नानासाहेब देशमुख व त्यांच्या कर्मचारीवर्गाने, व  नेते गौतम दादा भराडे, सुरेश कदम, रमेश शिर्के रोहिदास मोगल नारायण कदम  त्याचबरोबर स्वागताचे आयोजन दत्ता गरुड सृष्टी अंबुरे नारायण पारधे मामा बालाजी मोगले  सोपान खिल्लारे लक्ष्मण  खिस्ते बालाजी गरुड हरिभाऊ गरुड, व सर्व पालक वर्ग यांनी केले .विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या