💥एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन💥
✍️ मोहन चौकेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी शिवसैनिकांना बांधील आहे. तुम्ही मला समोर येवून सांगा, मी मुख्यमंत्रीपद काय, शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे, अशा शब्दात आज भावनिक साद घातली.त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज सर्वांशी संवाद साधला आणि आपली भूमिका मांडली. पण त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट सांगितले नाही. उलट त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना माझ्या समोर यावं आणि मला सांगावं की राजीनामा द्यायला सांगावे, असं आवाहन केले. त्यांच्या या विधानानंतर एकनाथ शिंदे यांच्याच कोर्टात चेंडू परत भिरकावल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता एकनाथ शिंदे नेमकं काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ते पत्रकार परिषद घेवून की, ट्विटरवरून आपले मत मांडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर शिंदे यांनी ट्विट केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
* मविआ सरकारमधून बाहेर पडा; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आवाहन :-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आवाहनावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून त्यांची भुमीका स्पष्ट केली. राज्यात सुरु असणाऱ्या अभूतपूर्व सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीला सध्या वेगळं रूप आलेलं आहे.गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आहे. या सगळ्यात शिवसैनिक हा भरडला गेला आहे. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे. असं मत व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री पदाचा कुठेच उल्लेख न करता हे त्यांनी मत व्यक्त केलं आहे.*
* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय म्हणाले :-
'काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या मंडळींनी जर मी मुख्यमंत्री म्हणून नको सांगितलं असतं तर मी समजून घेतलं असतं. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं. माझ्या सहकाऱ्यांनी सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ तोंडावर सांगावं, मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो.राजीनाम्याचं पत्रही तयार करुन ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी इथे परत यावं आणि माझं पत्र घेऊन राज्यपालांना द्यावं. ही लाचारी किंवा मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार आहे. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला नक्कीच त्याचा आनंद आहे.'असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे.....
✍️मोहन चौकेकर
0 टिप्पण्या