💥कृतीयुक्त अध्यापन, पालक संपर्क वाढवणे,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
जिंतूर तालुक्यातील मालेगाव जिल्हा परिषद शाळेत आज बुधवारी पाचलेगाव केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये निपून भारत अभियानांतर्गत पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश व कृतीयुक्त अध्यापन, पालक संपर्क वाढवणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवणे, केंद्रातील इतर शाळांमधील उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव ऐकून ते आपल्या शाळेत राबविणे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब जल्हारे, मुख्याध्यापक प्रकाश वाकळे, यांच्यासह पाचलेगाव केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.....
0 टिप्पण्या