💥नांदेड जिल्ह्यातील धान्य घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकरला कोठडी...!


💥धान्य घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर मागील ३ वर्षापासून देत होता हुलकावनी💥

परभणी (दि.१७ जुन २०२२) :  नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीत सन २०१८ यावर्षी उघडकीस आलेल्या व राज्यात गाजलेल्या शासकीय स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर या गोरगरीबांच्या तोंडचा घास पळवून शासकीय स्वस्त धान्य माफियांच्या मुखात घालणाऱ्या भ्रष्ट नौकरशहाने काल गुरुवारी दि.१६ जुन २०२२ रोजी रात्री तब्बल तिन वर्षाच्या कालावधी नंतर अखेरा नांदेड जिल्ह्यातील  नायगाव न्यायालयासमोर शरणागती पत्करली.


         दरम्यान आज शुक्रवार दि.१७ जुन २०२२ रोजी नायगाव न्यायालयाने वेणीकर यास २० जून २०२२ पर्यत राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या कोठडीत रवानगी केली सन २०१८ या वर्षात नांदेड जिल्ह्यात मोठा धान्य घोटाळा उघडकीस आला. त्यावेळी इंडिया मेघा अ‍ॅग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती, वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार, ललीतराज खुराणा यासह अन्य छोट्या-मोठ्या व्यक्ती आरोपी म्हणून उघडकीस आल्या. विशेषतः गोदाम पालासह गोदाम सुरक्षारक्षकापासून ते तत्कालीन पुरवठा अधिकारी म्हणून संतोष वेणीकर याचेही नाव आरोपी म्हणून समोर आले. नांदेडचे तत्कालीन पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या या घोटाळ्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्त करण्यात आला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक बड्या आरोपींना या पथकाने गजाआड केले. परंतु, उपजिल्हाधिकारी वेणीकर तब्बल तीन वर्षांपासून ऐनकेन प्रकारे जामीनाकरीता प्रयत्नशील होता. त्याने जामीन मिळावा म्हणून, नायगाव, बिलोली आणि औरंगाबाद न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने हा सार्वजनिक गुन्हा असल्यामुळे जामीन फेटाळला. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयात त्याने जामीन दाखल करुन परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला होता. मात्र, हे प्रकरण ईडीकडे गेल्यानंतर व मुख्य आरोपी अजय बाहेती याला  ईडीने नागपूरात अटक केल्यानंतर वेणीकर हा पुन्हा फरार झाला. अखेरपर्यंत कुठेच जामीन होत नसल्याने त्याने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले.

          दरम्यान, वेणीकर हे फरार असतांनासुध्दा परभणी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वीही ते परभणीत कार्यरत होते. परंतु, परभणीतील संपूर्ण कारकीर्दच वादग्रस्त ठरली होती, हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या